‘सरकार जर ऐकणार नसेल तर वेगळ्या भाषेत सांगावं लागेल’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शेकापच्या ज्येष्ठ नेत्याने राज्य सरकारच्या विरोधात दंड थोपडले आहेत. शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्त केला. सरकारला पाटील यांनी याबाबत आव्हान दिले असून थेट आंदोनाचा इशारा दिला आहे.

एन. डी पाटील यांनी इशारा दिला आहे की सरकारने 10 जानेवारीपर्यंत शेती पंपाच्या बिलाचा गोंधळ सोडवावा अन्यथा त्यानंतर आम्ही ऊर्जामंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही असा थेट अल्टिमेटम दिला आहे.

कोल्हापूरात आयोजित महापूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की जी वीज आम्ही वापरली नाही त्याचे बिल आम्ही भरणार नाही आम्ही वीज वापरलेली नाही याचा पुरावा आमच्याकडे आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही वीज वापरली तर आम्हाला त्याचा पुरावा द्या असे आव्हान राज्य सरकारला दिले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील सरकारला सुनावले की जर सरकार ऐकणार नसेल तर वेगळ्या भाषेत सांगावे लागेल असे सांगितले.

आज जर काही चुकींचा बोललो तर त्याला जबाबदार माझ्या वडिलांचे मित्र आणि ज्यांनी ही जबाबदारी घ्यायचा आदेश मला दिला ते पवार साहेब असतील असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याती कार्यक्रमात सत्तास्थापनेवर भाष्य केले. साखर कारखानदारी आणि शरद पवार यांचे राजकारण याबाबतही गंमतीदार भाष्य केले आहे.

कमी जागेत जास्त उत्पादन कसं घ्यायचं हे पवार साहेब शिकवतात, कमी आमदारांच्या जागेत सरकार कसं बनवायचं हे ही त्यांनी शिकवलं. असे उद्धव ठाकरे यांनी सांगत शरद पवारांची स्तुती केली. आमच्याकडे जास्त जागा आहेत म्हणून कोणी ओरडू नये असा टोला देखील भाजपला त्यांनी लगावला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/