माजी मंत्री विनायक पाटील यांचे निधन

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी मंत्री, लेखक आणि साहित्यिक विनायक पाटील ( Vinayak Patil) यांचे निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर कोरोनाचे ( Corona) उपचार सुरु होते. त्यातून बाहेर आल्यानंतर ते नाशिकला ( Nashik) त्यांच्या घरी होते. पण त्यानंतर काल रात्री त्यांची अचानक प्रकृती ढासळल्याने त्यांचे निधन झाले. पाटील यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक महत्वाच्या खात्यांची जबाबदारी पार पाडली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackery) वाहिली श्रद्धांजली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाटील यांना श्रद्धांजली वाहिली असून सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात विविध भूमिका पाडणारे तसेच कृषी, वनक्षेत्र, सहकार आणि शेतकऱ्याच्या हक्कासाठी काम करणारे नेतृत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विनायक पाटील यांनी विविध क्षेत्रामध्ये आपला कामाचा ठसा उमटवला. विनायक पाटील यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला होता.

कुंदेवाडीचे सरपंच ते राज्यातील मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. वनशेती महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. त्याचबरोबर वाशेतीमध्ये त्यांचे विशेष कार्य होते. त्यांच्या कार्याची विविध स्तरावर दखल देखील घेण्यात आली होती. यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.दरम्यान, राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे जेष्ठ नेतृत्व आपण विनायक पाटील यांच्या रूपाने गमावल्याची भावना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackery) यांनी यावेळी श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली.