इंदापूरच्या जागेचा निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील – जयंत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय पक्ष तिकीट वाटपावरून चाचपणी करत आहेत. निवडणूक म्हटली की, मतांची आकडेवारी तयार करण्यासाठी योग्य उमेदवार देणे अतिशय महत्वाचे असते. इंदापूरच्या जागेवरून सध्या कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु आहे.

इंदापूर मतदार संघातील धनगर समाजाची मते कोणीकडे वळतील यावरून नेमका अंदाज येत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे राहुल गांधी ही जागा कोणाला सोडायची याचा निर्णय घेतील. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

इंदापूरच्या जागेवरून वाद प्रतिवाद
इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे दत्ता भरणे हे आमदार आहेत. त्यांना उमेदवारी न देता जर उमेदवारी हर्षवर्धन पाटील यांना देण्यात आली तर त्याचा परिणाम, बारामती, कर्जत – जामखेड मध्ये होऊ शकतो. तेथे राम शिंदे उभे राहणार आहेत. त्यामुळे धनगर समाजाची मते तिकडे वळू शकतात. मतांचे कशा प्रकारे विभाजन होईल याचा नेमका अंदाज येत नसल्यामुळे बारामतीमध्ये पवार यांना सुद्धा धक्का बसू शकतो.

महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते असल्यामुळे ते ही विरोधात आहेत. अशी काही समीकरणे असल्यामुळे इंदापूरच्या जागेचा निर्णय घेणे अवघड जात आहे. हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या भाषणाबद्दल जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, कोणी काय बोलावे हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

केवळ इंदापूरच्या निर्णय लटकला आहे
इंदापूरच्या जागेवरून आमची युतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली तेव्हा इंदापूर च्या जागेचा निर्णय हा दोन्ही पक्षांनी वरिष्ठ नेत्यांवर सोडून दिला असल्याचे सांगितले आहे. बाकी मतदासंघाचा निर्णय दोन्ही पक्षाच्या चर्चेत घेण्यात आला आहे. केवळ इंदापूरच्या जागेचा प्रश्न पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर सोपवला आहे. आमचे प्रत्येकी ११० जगावर निर्णय झाले आहेत. दुसऱ्या इतर कोणत्याही मतदारसंघाबाबत वाद नाहीये असे जयंत पाटील म्हणाले.

हर्षवर्धन पाटलांनी व्यक्त केली खंत
इंदापूर मध्ये जाहीर सभा घेऊन हर्षवर्धन पाटील यांनी लोकांना जाहीर प्रश्न केला होता तो म्हणजे, मी काय केले पाहिजे असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विचारला होता. हर्षवर्धन पाटील यांनी असे सांगितले की, खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी आपल्याला शब्द दिला होता पण दिलेल्या शब्दापासून ते दूर जात आहेत. आपली यापूर्वीही अशी फसवणूक अनेकदा झाली असे ते म्हणाले.