मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीधर देशपांडे यांचे निधन

नाशिक : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे आज सकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मनीषा, मुलगा हेमंत, सून अश्विनी आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. देशपांडे हे गेल्या एक आठवड्यापासून आजारी होते. काल सायंकाळी त्यांची प्रकृती गंभीर होत गेली. त्यानंतर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

श्रीधर देशपांडे यांनी विमा कर्मचार्‍यांचे नेते म्हणून सुमारे ५ दशके भरीव कार्य केले. माकपचे शहर सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व सिटू संघटनेमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. जिल्ह्यातील बंद पडलेल्या बँका व पतसंस्थांच्या ठेवीदारांचे लढ्याचे त्यांनी नेतृत्व करीत न्याय मिळवून दिला.