‘गादी’चे वारस वेगळे, ‘रक्ता’चे वारस वेगळे, राष्ट्रवादीच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याकडून राऊतांचं ‘समर्थन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपतीचे वारसदार असल्याचे पुरावे मागितले होते. या वरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले असून संजय राऊत यांच्यावर टीका होत आहे. तर संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी समर्थन केले आहे. गादीचे वारस वेगळे आणि रक्ताचे वारस वेगळे असे म्हणत मलिकांनी संजय राऊत यांचे समर्थन केले आहे.

राज्यसभेचे तिकीट मिळावे यासाठी उदयनराजे भोसले यांनी लोटांगण घातले आहे असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक बोलत होते. ते म्हणाले, देशात गादीचे वारस असलेले आणि रक्ताचे नाते असलेले अनेक राजे आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी उदयनराजे हे महाराजांचे गादीचे वारस आहेत की रक्ताचे वारस आहेत, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केले आहे. आता उदयनराजे यांनी संजय राऊत यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. त्यापूर्वी उदयनराजे यांनी शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का ? शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा असा सल्ला दिला, याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान राऊत यांनी दिले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/