MMRDA चे संचालक कुलवेंद्र सिंह यांचा चौथ्या मजल्यावरून कोसळून मृत्यू, घात की अपघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणाचे (MMRDA) संचालक कुलवेंद्र सिंह कपूर यांचे चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून कोसळून निधन झाले असून हा अपघात आहे कि आत्महत्या किंवा घातपात याचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. घटना घडली तेव्हा घरामध्ये त्यांची पत्नी आणि 25 वर्षाचा मुलगा होता.

कुलवेंद्र सिंह कपूर (वय-55) हे वांद्रे कुर्ला संकुलातील एका इमारतीत कटुंबीयांसह वास्तव्याला होते. चौथ्या मजल्यावरील प्लॅटमधून ते काल रात्री कोसळले आणि एकच खळबळ उडाली. कुलवेंद्र सिंह हे बेशुद्धवस्थेत पडल्याचे पाहून सुरक्षा रक्षकाने तातडीने सर्वांना घटनेची माहिती दिली. यानंतर MMRDA अधिकारी, त्यांच्या पत्नी आणि मुलाने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कपूर हे MMRDAच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी पश्चिम रेल्वे येथे कार्यरत होते. 2 जलै 2019 पासून ते MMRDA कार्यरत होते. बीकेसी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

कुलवेंद्र कपूर हे चौथ्या मजल्यावरून कोसळले आहेत. त्यांनी उडी मारली की ते अपघाताने कोसळले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेवेळी घरामध्ये पत्नी आणि मुलगा घरात होते. अपघातानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणी त्यांना मृत घोषीत करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणाची अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे, असे बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद मुळ्ये यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like