वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांचे आज (शुक्रवार) अल्पशा आजाराने निधन झाले आहे. नाशिक येथील अपोलो हॉस्पीटलमध्ये त्यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांची नंदुरबार येथुन नाशिक येथे बदली झाली होती.
गिरीष पाटील हे अत्यंत मनमिळावु स्वभावाचे होते. त्यांची अंत्ययात्रा मारवड (ता. अमळनेर) येथील राहत्या घरून दुपारी 4 वाजता निघणार आहे. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा व मुलगी आहे. गिरीष पाटील यांना पोलीसनामा टीमकडून भावपूर्ण श्रध्दांजली.
Loading...
You might also like