‘मी 67 मधील बाळासाहेबांचा सैनिक’, जेष्ठ शिवसैनिकाचा ‘मनसे’ आशीर्वाद, कॉल रेकॉर्डिंग झालं ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गोरेगाव येथे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या अधिवेशनाला सुरुवात झाली यावेळी राज ठाकरेंनी स्वतः मनसेच्या नवीन ध्वजाचे अनावरण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी आज हिंदुहृदय सम्राट यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांच्या या अधिवेशनाची चर्चा होती मात्र आता राज ठाकरे हिंदुत्वाची कास धरणार एवढं मात्र निश्चित झालं आहे.

मनसेने आपला झेंडा पूर्णपणे भगवा करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा टाकली आहे मनसेच्या या नव्या झेंड्यात राजमुद्रा असल्यामुळे संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांनी याला विरोध दर्शवला होता. मात्र आता मनसैनिकांसोबत जेष्ठ शिवसैनिकांडून देखील याचे स्वागत केले जात आहे.

मनसे नेत्या रुपाली पाटील यांना एका मुंबईतील जेष्ठ शिवसैनिकाने कॉल केला आणि तुम्ही मांडलेली भूमिका योग्य असल्याचे सांगितले आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हे ऑडिओ रेकॉर्डिंग पोस्ट करण्यात आले आहे.

काय म्हणताहेत या फोनमधील जेष्ठ शिवसैनिक
या संवादामध्ये ज्येष्ठ शिवसैनिक माधव लेले म्हणतात की, मी ६७ मधील बाळासाहेबांचा सैनिक आहे. पूर्वी आम्ही मोरारजींची गाडी अडवायला जायचो पण आता अंगात शक्ती राहिलेली नाही. आत्ताचे लोक विचारांशी ठाम नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी ठाम होते. रस्त्यावर उतरुन संघर्ष करणं जमलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा –