ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ‘शाहू पुरस्कार’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- कोल्हापूर येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा मानाचा ‘शाहू पुरस्कार’ माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आज जाहीर करण्यात आला आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि विश्वस्त व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २६ जूनला शाहू जयंतीदिनी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारकमध्ये होणाऱ्या समारंभात पुरस्काराचे वितरण होईल.

अण्णा हजारे यांचा थोडक्यात परिचय?
किसन बाबूराव हजारे हे देशाला अण्णा हजारे या नावानेच परिचित आहेत. मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे अण्णा हजारे हे भारतातील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांना समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने १९९० साली ‘पद्मश्री’ आणि १९९२ साली ‘पद्मभूषण’ पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी लोकसहभागातून राळेगणसिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला. त्यांच्यामुळे माहिती अधिकार कायदा आस्तित्वात आला. लोकपाल व लोकायुक्तांच्या विधेयकासाठी त्यांनी देशभरातील वातावरण पेटविले होते.

Loading...
You might also like