ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विलास वाघ यांचे निधन

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे अग्रदूत, सुगावा प्रकाशनाचे सर्वेसर्वा प्रा.विलास वाघ (83)  यांचे कोरोनामुळे निधन झाले. गुरुवारी (दि.25) पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विविध पुरोगामी संस्था-संघटनेशी त्यांचा निकटचा संबध होता.

सुगावा प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रबोधनात्मक परिवर्तनवादी साहित्याची निर्मिती केली. प्रा. वाघ यांचे आंतरजातीय धर्मीय विवाह चळवळीतही मोलाचे योगदान होते. तसेच वंचित, दुर्लक्षीत समाज घटकांसाठी तळेगाव ढमढेरे येथे त्यांनी आश्रमशाळा, वसतिगृह सुरु केले होते. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले होते.