6000 रुपयाची लाच घेताना महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन विद्युत मिटर बसवण्यासाठी बदलापूर महावितरण कार्यालयातील वरीष्ठ तंत्रज्ञाला 6 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (शुक्रवार) बदलापूर एच पी सी एल पेट्रोल पंपाच्या समोरील रोडवर करण्यात आली. संजय ज्योती कांबळे (वय-50) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

बदलापूर तालुक्यातील वांगणी येथील 28 वर्षीय तक्रारदाराने नवीन विद्युत मिटर बसवून देण्यासाठी बदलापूर कार्यालयात अर्ज केला होता. नवीन विद्युत मिटर बसवण्यासाठी संजय कांबळे यांने 6 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार आज यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता कांबळे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. कांबळे याने एच पी सी एल पेट्रोल पंपाच्या समोरील रोडवर लाच स्विकारण्याचे कबुल केले. त्यानुसार लाचलुचपत अधिकाऱ्यांनी याठिकाणी सापळा रचून तक्रारदाराकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/