Coronavirus : DSP च्या मुलानं परदेशात जाण्याबाबत लपवलं, बनला ‘कोरोना’ग्रस्त, FIR दाखल

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात १८ हजाराहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर भारतात या विषाणूमुळे ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूमुळे पीडित व्यक्तीपासून अंतर ठेवण्याची आणि त्याला न भेटण्याची सूचना सरकारने लोकांना केली आहे, परंतु सामान्य लोकच नाही तर काही अधिकारीही त्याचे पालन करीत नाहीत, यामुळे त्याचा प्रसार अधिक होण्याचा धोका वाढला आहे. अशाच एका अधिकाऱ्याला आपल्या कोरोना विषाणूग्रस्त मुलाला भेटणे महागात पडले आहे. त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंदविली आहे.

तेलंगणाच्या भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) ची चाचणी घेण्यात आली तेव्हा त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. एका दिवसाआधी त्याच अधिकाऱ्याच्या मुलाची चौकशी केली गेली तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. रात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या एका निवेदनात अधिकाऱ्यांनी सांगितले की ५७ वर्षीय पोलिस अधिकाऱ्यासह त्यांच्या घरात काम करणारी एक ३३ वर्षीय महिला देखील या विषाणूमुळे पीडित असल्याचे आढळले.

डीएसपीच्या मुलाच्या चाचणीनंतर त्याच्यामुळे दोन जणांना संसर्ग झाला, त्यामुळे डीएसपीचा मुलगा राहत असलेल्या निवासस्थानापासून ३ किमीच्या आत भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात नियंत्रण केंद्र सुरू केले जात आहेत. यासह, विषाणूचा प्रसार आणखी वाढू नये यासाठी ७ किमीचा बफर झोन देखील तयार केला जात आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई देखील केली गेली आहे. १८ मार्च रोजी लंडनहून घरी परत आल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांना न कळविल्याबद्दल डीएसपी आणि त्यांच्या मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, कारण नंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएसपी एसएम अली यांनी आपला मुलगा परदेशातून परत आल्यानंतर अशा अधिकाऱ्यांना सूचित नाही केले, ज्यांना परदेशातून परतणाऱ्या सर्व व्यक्तींना आपली माहिती द्यायची असते. वृत्तानुसार, डीएसपीचा मुलगा अनेक वेळा परदेशात गेला होता आणि १९ मार्च रोजी केस कापून आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी येथे एका कौटुंबिक कार्यक्रमातही गेला होता.

अधिकाऱ्यांनी नंतर राज्य शासनाद्वारे सक्तीपूर्वक अधिकाऱ्याची तपासणी केली तर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची खात्री पटली. अली सध्या कोठागुडेम शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध आयपीसी कलम १८८ (लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून एफआयआरची प्रतही त्यांना देण्यात आली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून डीएसपी सोबत त्यांची पत्नी, मुले आणि सुरक्षा म्हणून तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. कारण कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखता येईल. दरम्यान देशभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत ५८२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ११ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ४६ लोक बरे झाले आहेत. कोरोना विषाणूची संख्या महाराष्ट्र व केरळमध्ये सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात ११२ आणि केरळमध्ये १०५ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉकडाउन जाहीर केले आहे.