कोंढव्यात नवजात अर्भक सापडल्याने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज सकाळी एक पुरुष जातीचे नवजात अर्भक सापडले आहे. एनआयबीएम रोडयेथील मेहफेर एलिगंजा सोसायटी जवळील मोकळ्या पटांगणात हे नवजात अर्भक आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) सकाळी नऊच्या सुमारास सेफी हुसेन भारनेवाला (वय ४५, राहणार. कोंढवा खुर्द) यांनी एनआयबीएम रोड येथील मेहफेर एलिगंजा सोसायटी जवळील मोकळ्या पटांगणात एक नवजात अर्भक दिसून आले. त्यांनी कोंढवा पोलिसांना याची माहिती दिली. कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विठ्ठल जाधव, पोलिस शिपाई सागर सूर्यवंशी, महिला पोलीस शिपाई राणी जाधव, रूपाली शिंदे, पूजा कदम यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन नवजात अर्भक ताब्यात घेतले. परिसरात अर्भकाबाबत चौकशी केली असता नातेवाईक मिळून आले नाही. त्यामुळे अर्भक मुलगा अजय (तात्पुरते नाव ठेवण्यात आले आहे) ससून हॉस्पिटल मधील बालसंगोपन केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

सदर घटनेप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.

Loading...
You might also like