पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी बॉम्बच्या अफवेने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सलग दुसऱ्या दिवशी पुण्यातील मध्यवस्तीत बेवारस संशयित बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने खळबळ उडाली. परंतु बॉम्बशोधक व नाशक पथकाने येऊन पाहणी केल्यानंतर मात्र बॅगमध्ये कपडे ठेवलेले असल्याचे आढळून आले. काल लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ एका दुकानासमोर बेवारस बॅग मिळाली होती. त्यातही खाद्यपदार्थ आढळून आले होते.

मंगळवार पेठेत पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरु रुग्णालय आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रुग्णालयातील चौकशी केंद्राजवळ एक बेवासर बॅग नागरिकांना आढळून आली. त्यावेळी त्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याची वार्ता पसरली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती फरासखाना पोलीस आणि नियंत्रण कक्षाला देण्यात आली. या अफवेने पोलिसांचीही तारांबळ उडाली. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस)च्या पथकाला देण्यात आली. त्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत  बॅगेची तपासणी केली. तेव्हा त्या बॅगमध्ये महिलेचे कपडे आढळून आले. त्यानंतर ही केवळ अफवा असल्याचे समोर आले.

गुरुवारी दुपारी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ अशाच प्रकारे बेवारस बॅग मिळून आली होती. त्यामुळे यंत्रणांची धावपळ उडाली होती. त्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने तपासणी केल्यानंतर त्यात खाद्यपदार्थ असल्याचे समोर आले. सलग दुसऱ्या दिवशी अशा प्रकारची घटना समोर आल्याने पोलीस व यंत्रणांची धावपळ उडाली. बेवारस बॅग आढळून आल्यास नागरिकांनी अफवा