धक्कादायक ! मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर ‘सामुहिक’ बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मॉर्निंगवॉक करण्यासाठी आलेल्या तरुणीला गर्दुल्यांची चाकूचा धाक दाखवून अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर सामोहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालासोपारा पूर्वेकडील परिसरात राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन तरुणी आपल्या 5 मित्र मैत्रिणीसोबत शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान आचोळे तलाव येथे मॉर्निंग वॉक करत होती.

नवनीत हॉस्पिटलच्यासमोर आरोपी गर्दुल्ले अमित बटला, कैलाश संतोष वीर, रोहित उर्फ मेंटल जयभगवान तनजोटकर आणि रोहन उर्फ टायगर संजय जगदाळे यांनी पीडित तरुणीला सोबत येण्यासाठी सांगितले मात्र तरुणीने याला विरोध केला असता सर्व गर्दुल्ल्यानी बाकीच्या मित्र मैत्रणीना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांनतर चाकूचा धाक धाकऊन अज्ञात स्थळी घेऊन गेले.

गर्दुल्ल्यानी तरुणीला वैतवाडी येथील एका इमारतीचे काम चालू असलेल्या ठिकाणी नेले आणि त्याच ठिकाणी तीच्यावर सामोहिक बलात्कार केला. पीडित तरुणीने तुळींज पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ आरोपी कैलास आणि रोहित यांना ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like