धक्कादायक ! पैज लावण्यातून मित्राच्या गुप्तांगाला दिले चटके

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रबाळे एमआयडीसी परिसरात दारूच्या नशेत मित्राच्या गुप्तांगाला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. रंगपंचमीनंतर पैज लावण्यातून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.

काल रंगपंचमीनंतर चार ते पाच जण मित्र दारूची पार्टी करत होते. त्यावेळी दोघांनी काडीपेटीने एकाच्या गुप्तांगाला चटके दिले असून, पीडित मुलाच्या गुप्तांगाला जखम झाल्यानंतर पीडित मुलाने याबाबत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आला.

त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली.