फक्त एका मिनिटात तब्बल 4 लाख कोटींचा ‘चुराडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोना व्हायरस ने घातलेला धुमाकूळ आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने येस बँकेवर घातलेल्या निर्बंधांमुळे गुंतवणूकदारांनी बाजारात शेअरची जोरदार विक्री केली. यामुळे सकाळी बाजार उघडताच १४०० अंकांनी बाजार कोसळला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३५० अंकांनी कोसळला. यामुळे गुंवणूकदारांना तब्बल ४ लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.

आरबीआय ने येस बँकेवर निर्बंध लादल्यामुळे खातेधारकांना महिन्यास फक्त ५०,००० रुपये काढता येणार आहेत. जास्त रक्कम काढायची असेल तर आरबीआय ची परवानगी घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय खर्च, विदेशी शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी खातेधारकांना पैसे काढता येणार आहेत. आरबीआय ने येस बँकेचे संचालक पद बरखास्त केले असून, येस बँक भांडवल उभे करू शकले नाही, म्हणून बँकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

रिझर्व्ह बँकेने मागच्या वर्षी घोटाळ्यामुळे पीएमसी बँकेवरही निर्बंध लादले होते, यामुळे खातेदारांचे मोठे हाल झाले होते.