‘या’ कारणामुळं सेन्सेक्स 793 आणि निफ्टी 228 अंकाने वाढून झाला बंद, गुंतवणूकदारांना 2.43 लाख कोटींचा फायदा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आठवड्यात कामकाजाच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत शेअर बाजार सेन्सेक्स (Sensex ) आणि निफ्टी (Nifty ) मध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. जागतिक स्तरावर अमेरिका आणि चीन यांच्यातलं व्यापार युद्ध (Trade War ) थांबवण्यावरून झालेल्या वाटाघाटीवरून शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मागच्या आठवड्यात अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम जाणवतो आहे.

तसेच बँकांना 70 हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच BSE चा ३० शेअर चा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स ७९३ अंकांनी वाढून ३७,४९४ वर बंद झाला. तसेच NSE शेअर चा प्रमुख इंडेक्स निफ्टी २२८ अंकांनी वाढून ११,०५७ वर बंद झाला. ह्या तेजीमध्ये गुंतवणूकदारांना काही तासातच २ लाख 43 करोड रुपयांचा फायदा झाला आहे.

मार्केट एक्स्पर्ट यांच्या म्हणण्यानुसार, शेयर बाजारामध्ये आठवड्याच्या शेवटी संपुष्टात येणाऱ्या शॉर्ट कव्हरिंग आहेत. सरकारकडून उचलल्या गेलेल्या गोष्टींचा परिणाम सुद्धा शेअर मार्केटवर दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मूलभूत शेअर मध्ये आपली गुंतवणूक केलेली चांगली राहील.

कर्जात डुबलेल्या NBFC कंपंन्यांना मिळणार आधार

तज्ज्ञ सांगतात कि, चालू आठवड्याच्या शेवटी ट्रेडर्स शॉर्ट कवरिंग करत आहेत. सोबतच सरकारला मोठा सरप्लस कैश रिजर्व मिळणार आहे. हे आजच्या आरबीआय च्या बैठकीतुन समजून आले. ज्याचा वापर कर्जात डुबलेल्या NBFC कंपंन्यांना आधार मिळण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. त्यामुळेच शेअर बाजाराच्या खालच्या पातळीवरुन जोरदार तेजी दिसून आली आहे.

मार्केट तज्ञ उद्यान मुखर्जी यांनी सीएनबीसी आवाजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, शुक्रवारी अर्थमंत्र्यांनी केलेल्या सर्व घोषणा चांगल्या आणि आवश्यक आहेत. परंतु याचा अर्थकारणावर फारसा परिणाम होणार नाही. या परिस्थितीत आपण सावध असणे आवश्यक आहे. अर्थमंत्र्यांनीही पुढील पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. बाजार आणि अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल होणार नाहीत. परंतु भावनेत नक्कीच बदल होईल.

मुखर्जी म्हणतात की, शेअर बाजाराच्या व्यापाऱ्यांनी प्रत्येक तेजी वर नफा कमावला पाहिजे. अशा परिस्थितीत फार आक्रमक व्यापार करु नका. निफ्टीला खालच्या स्तरावर १०७५०-१०८०० वर समर्थन मिळू शकेल. त्याच वेळी निफ्टीसाठी १११००-११२०० येथे महत्त्वपूर्ण नोंदी आहेत . याचाच अर्थ निफ्टी १०७५० ते ११२०० च्या श्रेणीत काम करताना दिसणार आहेत.

एस्कॉर्ट सिक्युरिटीचे प्रमुख असिफ इक्बाल यांनी सांगितले कि, गुंतवणूकदारांनी छोट्या मूलभूत शेअर मध्ये पैसे गुंतवले पाहिजेत. तसेच आपली गुंतवणूक म्युचूअल फंड्स मध्ये केली पाहिजे.

आरोग्यविषयक वृत्त –