शेअर बाजारात हाहाकार : सेन्सेक्सची पुन्हा जोरदार घसरण 

मुंबई/नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

भारतीय शेअर बाजाराकरिता आजची गुरुवारची सकाळ चांगलीच हादरवून सोडणारी ठरली. बाजार सुरु होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1 हजार अंकांच्या घसरणीसह सुरु झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार देखील 250 अंकांनी घसरला. सेन्सेक्समधील घसरणीमुळे निर्देशांक 33 हजार 774.89 अंकांवर पोहोचला आहे. बाजारात झालेल्या या भूकंपामुळे पाच मिनिटांत गुंतवणुक दारांचे 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयांची सुरु असलेली घसरण आज देखील सुरुच राहिली. गुरुवारी रुपया 9 पैशांनी घसरला आणि तो 74.45 रुपयांवर पोहोचला.

 [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’683e0334-cd37-11e8-aec7-31803c30ac13′]

गुरुवारी सकाळी सेन्सेक्स 697.07 अंकांनी म्हणजेच 2.01 टक्क्यांच्या घसरणीसह 34 हजार 063.82 अंकांवर सुरु झाला तर निफ्टीत 290 अंकांची घसरण होत तो 10 हजार 169.80 अंकांवर खुला झाला. बाजार सुरु होताच सुरु झालेली ही घसरण आणखी वाढली आणि काही मिनिटातच म्हणजे सकाळी 9.22 मिनिटांनी सेन्सेक्समध्ये 1001.31 अंकांची (2.88 टक्के) घसरण झाली.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्समधील 31 पैकी 30 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत होती. तर निफ्टीतील 50 पैकी 46 शेअर्समध्ये घसरण होत होती. केवळ चार कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी होत होती.

 [amazon_link asins=’B07FZ63RD4,B07CWFPDWK,B003SO5OZQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83c68208-cd37-11e8-aca8-6d2f4dab5a6a’]

सेन्सेक्स कोणाला फटका बसला
अॅक्सेस- 4.91%, वेदांता- 4.15%, एसबीआय-4.05%, टाटा स्टील- 3.63%, भारती एअरटेल- 3.37%, मारुती- 3.18%, आयसीआयसीआय बँक- 3.15 टक्के, रिलायन्स- 3.13%
निफ्टीत कोणाला फटका बसला-
इंडियाबुल्स-7.49 टक्के, बजाज फायनान्स-6.82%, बजाज फायनान्स सर्व्हिस- 5.71%, अॅक्सेस बँक- 4.90% आयशर मोटर्स- 4.80%
आशियाई बाजार देखील कोसळले
सेन्सेक्स आणि निफ्टी बाजार कोसळण्याआधी आशिया खंडातील अन्य देशातील अन्य शेअर बाजार देखील कोसळले. आशियातील अन्य बाजारात 5 टक्क्यांची घसरण झाली. तैवान शेअर बाजार 5.21 टक्क्यांनी, जपानचा शेअर बाजार 3.7 टक्क्यांनी, कोरिया बाजार 2.9 टक्क्यांनी तर शांघाय बाजार 2.4 टक्क्यांनी कोसळला. याशिवाय चीन आणि अन्य देशातील बाजार देखील कोसळले आहेत.
सकाळी 9.40च्या सुमारास बाजार थोडा सावरला, घसरण 882.18 अंकांवर
पाच मिनिटात गुंतवणुकदारांचे 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान
डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये देखील मोठी घसरण
निफ्टीमध्ये देखील 311 अंकांची घसरण
सेन्सेक्स जवळ जवळ 1 हजार अंकांनी गडगडला
बाजार सुरु होताच शेअर बाजारात खळबळ