हुर्रे… ! सेन्सेक्सची विक्रमी उसळी ; ओलांडला मोठा टप्पा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मंगळवारी (दि. १६) शेअर बाजाराच्या अंकात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आज बाजार बंद होताना सेन्सेक्स ३६९.८० अंकांनी वाढून ३९.२७५.६४ अंकावर स्थिरावला. तर निफ्टी ९६.८० अंकांनी वाढून ११,७८७.१५ अंकावर पोहोचला. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभागाने यंदा मॉन्सूनमध्ये जवळपास सामान्य पावसाचा वर्तविलेला अंदाज, आशियातील बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ कायम राहिल्याने सेन्सेक्स वधारल्याचे सांगण्यात येत आहे.

यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस पडणार असालयाची आनंदवार्ता हवामान खात्याने दिली. त्यामुळे सामान्य नागरिक तसेच शेतकरी वर्ग तर या बातमीमुळे आनंदी झाला आहे. सोन्याचा दर देखील घसरला आहे. त्यातच आज शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. आशियायी बाजारात देखील सकारात्मक संकेत मिळाले आहेत.

दुपारच्या सत्रात सेन्सेक्सने ३९,२७६ अंकांचा टप्पा ओलांडला होता. ही वाढ बाजार बंद होईपर्यंत कायम राहिली. मुख्यतः आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, ओएनजीसी, एल अँड टी, मारुती, एशिएन पेंटस, ॲक्सिस बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. अमेरिका आणि चीन दरम्यानचे ट्रेड वॉर थांबण्याचे संकेत मिळत असून त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात दिसून येत आहेत.

Loading...
You might also like