.. म्हणून शेअर बाजारात जोरदार ‘तेजी’, सेंसेक्स 1862 तर निफ्टी 517 अंकांनी वाढून बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी मदत पॅकेजच्या घोषणेमुळे देशांतर्गत बाजारात वेगाने वाढ झाली आहे. BSE चे ३० शेअर असणारा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स १८६२ अंकांनी वाढून २८५३६ वर बंद झाला. तर एकीकडे NSE चे ५० शेअर असणारा प्रमुख इंडेक्स निफ्टी ५१७ अंकांनी वाढून ८,३१८ वर बंद झाला. २००९ नंतर बाजारात सर्वात मोठा INTRA-DAY पाहायला मिळाला. सेन्सेक्समध्ये १८०० अंकांनी जास्त वाढ दिसून आली. तर निफ्टी ६ टक्क्यांसह ८३०० वर बंद झाला. निफ्टी बँकही १४०० अंकांनी जास्त वाढून बंद झाला.

बँक निफ्टीमध्येही ९ टक्के वेगाने वाढ झाली. एव्हिएशन सेंटरला सरकारकडून १२,००० कोटींचे मदत पॅकेज मिळणार असल्याचे मानले जात आहे. यामुळे इंटरग्लोब एव्हिएशनमध्ये १० टक्क्याने वाढ झाली आहे. हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात रॉयल ओर्चीड, ताज जीव्हीके आणि ITDC मध्ये चांगली वाढ दिसून आली.

मोठ्या कंपनीचे शेअर त्याचसह छोट्या कंपनीचे शेअर
मध्यम शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. BSE चे मिड कॅप इंडेक्स जवळजवळ ४ टक्के आणि स्मॉल कॅप इंडेक्स जवळजवळ २.८५ टक्के वाढून बंद झाले. तर तेल-गॅस शेअरमध्येही चांगली खरेदी झाली. BSEचा ऑईल अँड गॅस इंडेक्स आज ३.५६ टक्क्यावर बंद झाला.