Lovebird ‘टायगर – दिशा’ यांच ‘ब्रेकअप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी. या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सध्या जोरदार आहे. नेहमी स्पॉट होणाऱ्या या जोडप्यांची एक मोठी गोष्ट चाहत्यांसमोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, टायगर आणि दिशा यादोघांच्या नात्यामध्ये फुट पडली आहे. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहून आता दोघे वेगळे झाले आहे. दोघांचेही ऑफशिअल ब्रेकअप झाले आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, एका सोर्सने माहिती दिली आहे की, ‘मागील काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यामध्ये ठिक नव्हते. दोघांनीही ऑफिशियली वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.’ हा निर्णय त्यांनी या आठवड्यात घेतला आहे. असे समजले आहे की, दिशा आता आदित्य ठाकरेसोबत जवळीक वाढवत आहे पण त्यांच्या ब्रेकअपचे कारण हे नाही. दोघांच्या सोबत राहणाऱ्या सोर्सने हे सांगितले की, ‘त्या दोघांचे खूप दिवस झाले खटकले होते. दोघांनाही एकत्र रहायचे होते पण त्यांना हे जाणवले की ते रिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा चांगले मित्र होऊ शकतात. यामुळे दोघांनीही मैत्रीचा स्विकार केला आहे. आता ते चांगले मित्र आहे. ‘

या निर्णयानंतर दोघे सोबत आहे. सध्या ते कपल नसून चांगले मित्र आहेत. या दोघांबद्दल बोलायचे म्हणले तर, अभिनेता टायगर श्रॉफ ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ चित्रपटात दिसून आला होता. अभिनेत्री दिशा पाटनी सलमान खानचा ‘भारत’ चित्रपटात दिसून आली होती. टायगर आता ऋतिक रोशनसोबत यशराजचा चित्रपटात दिसून येणार आहे. दिशा ‘मलंग’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपट सेटवर दिशा जखमी देखील झाली होती.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही