2 तारखेपासून श्राद्ध आणि 18 ला अधिकमास, वाचा सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या व्रत आणि सणांची यादी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सप्टेंबर महिना सुरु होत आहे, हा महिना धार्मिक रिती रिवाजांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पितृपक्ष म्हणजे श्राद्ध किती तारखेपासून सुरु होईल याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे. श्राद्ध 2 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. या महिन्यात पितृपक्षासोबत 18 सप्टेंबर पासून अधिकमास सूरू होत आहे. 3 सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या अश्विन महिन्यात हिंदू धर्मियांचे अनेक सण येत आहेत.

1 सप्टेंबर, मंगळवार : अनंत चतुर्दशी, गणेश विसर्जन, पौर्णिमा श्राद्ध

2 सप्टेंबर, बुधवार : भाद्रपद पौर्णिमा व्रत, प्रतिपदा श्राद्ध

3 सप्टेंबर, गुरुवार : अश्विन महिना सुरु

5 सप्टेंबर, शनिवार : संकष्टी चतुर्थी

10 सप्टेंबर, गुरुवार : जितीया व्रत, महालक्ष्मी व्रत, रोहिणी व्रत

13 सप्टेंबर, रविवार : इंदिरा एकादशी, एकादशी श्राद्ध

15 सप्टेंबर, मंगळवार : माघ श्राद्ध, मासिक शिवरात्री, प्रदोष व्रत

16 सप्टेंबर, बुधवार : कन्या संक्रांती, विश्वकर्मा पूजा

17 सप्टेंबर, गुरुवार : अश्विन अमावस्या, विश्वकर्मा पूजा

18 सप्टेंबर, शुक्रवार : पुरुषोत्तम अधिकमास प्रारंभ, चंद्र दर्शन

20 सप्टेंबर, रविवार : विनायकी चतुर्दशी व्रत

22 सप्टेंबर, मंगळवार : स्कंद सष्टी

24 सप्टेंबर, गुरुवार : मासिक दुर्गष्टमी

27 सप्टेंबर, रविवार : पद्मिनी एकादशी, कमला एकादशी, जागतिक पर्यावरण दिन

28 सप्टेंबर, सोमवार : पंचक प्रारंभ

29 सप्टेंबर, मंगळवार : प्रदोष व्रत (शुक्ल)