सेरेना विल्यम्सच्या त्या ड्रेसवर बंदीची मागणी

लंडन – वृत्तसंस्था 

अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सला फ्रेंच ओपन स्पर्धेत ‘ब्लॅक कॅट’ सुट घालता येणार नाही. फ्रेंच स्पर्धेत सेरेनाच्या खेळापेक्षा ब्लॅक सुटच अधिक चर्चेत होता . आयोजकांनी या स्पर्धेसाठी नवा ड्रेस कोड जाहीर केला आहे . त्यामुळे सेरेनाला तो सुट घातला येणार नाही. तरीही तिने तो घातल्यास तिच्यावर बंदीची कारवाई होऊ शकते. फ्रेंच स्पर्धेत सेरेनाच्या ब्लॅक सुटचीच अधिक चर्चा झाली होती. ब्लॅक पँथर्स या सुपरहिट चित्रपटातून प्रेरणा घेत सेरेनाने हा सुट घातला होता.

[amazon_link asins=’B00W6ZUMW8,B00IN3WZYA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fe640768-a848-11e8-8238-8feae9800dbb’]

फ्रान्स टेनिस महासंघाचे अध्यक्ष बर्नाड गियुडिसेलीने सांगितले की,”यापुढे असे काही चालणार नाही.खेळांसाठी नियमाने ठरवून दिलेलाच ड्रेसकोड घातला पाहिजे . तुम्हाला खेळ आणि या ठिकाणाचा आदर राखलाच पाहिजे.” मात्र, त्यांनी बदललेल्या नियमांबद्दल काहीच माहिती दिली नाही.