एक असा डॉक्टर, ज्यानं 100 जणांची केली हत्या, मृतदेह मगरीला खाऊ घातले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉक्टर सारख्या व्यवसायात राहून निर्घृणपणे हत्या करणारा हैवान देवेंद्र शर्माविषयी अधिक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी सिरियल किलर डॉ. देवेंद्र शर्माने कबूल केले होते की, 50 हत्येनंतर तो खून मोजणे विसरला होता. आता त्याने कबूल केले की, आतापर्यंत त्याने 100 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे, ज्यातील बहुतेकांना त्याने उत्तर प्रदेशातील एका कालव्यात मगरांचे अन्न बनवले. दरम्यान, देवेंद्र शर्मा नावाच्या एका डॉक्टरला गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतून पकडण्यात आले. तो किडनी प्रकरणात मागील 16 वर्षांपासून शिक्षा भोगत होता आणि आता तो पॅरोलवर बाहेर आला होता. 20 दिवसानंतर तो तुरूंगात परत जाणार होता पण तो अंडरग्राउंड झाला. आता पकडल्यानंतर त्याचा कारनामा समोर आला आहे.

गॅस एजन्सी लुटून विकत होता सिलिंडर
देवेंद्र शर्मा राजस्थानमध्ये डॉक्टरकी करता करता खुनी बनला. माहितीनुसार, गुंतवणूकीत फसवणूक झाल्यानंतर त्याने गुन्हेगारीचा पर्याय निवडला. त्यानंतर त्याने डॉक्टरकीसह किडनी ट्रान्सप्लांट रॅकेट, बनावट गॅस एजन्सी देखील चालवण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याने चोरीची वाहनेही विकली होती. आपल्या बनावट गॅस एजन्सीसाठी त्याला सिलिंडरची आवश्यकता भासली, तेव्हा तो गॅस डिलिव्हरी ट्रक लुटून गाडी चालकाचा बळी घेत असे.

वाहन चालकांचा मृतदेह कालव्यात फेकला
देवेंद्र कॅब चालकांना त्यांच्या गाडीसाठी ठार मारायचा. दिल्लीहून यूपीला जाण्यासाठी ही टोळी जी टॅक्सी बुक करायचे त्यांना लुटत असे. अटक केल्यावर शर्मा म्हणाला की, त्यांनी उत्तर प्रदेशातील कासगंजच्या हजारा कालव्यात मृतदेह टाकून द्यायचा. या कालव्यात मोठ्या प्रमाणात मगरी आहेत.

डॉक्टर अश्या प्रकारे बनला राक्षस
शर्माला आता बुधवारी दिल्लीहून अटक करण्यात आली. 1984 मध्ये, देवेंद्र शर्माने आर्युवेदिक मेडिसिनमध्ये आपली पदवी पूर्ण केली आणि राजस्थानमध्ये क्लिनिक उघडले. त्यानंतर 1994 मध्ये त्याने गॅस एजन्सीसाठी एका कंपनीत 11 लाखांची गुंतवणूक केली. पण कंपनी अचानक गायब झाली. तोटा झाल्यानंतर त्याने 1995 मध्ये बनावट गॅस एजन्सी उघडली. शर्माने एक टोळी तयार केली, जे एलपीजी सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकची लूट करायचे. यासाठी ते ड्रायव्हरला ठार मारायचे आणि ट्रकचीही विल्हेवाट लावायचे .

यावेळी त्याने टोळीसह सुमारे 24 खून केले. त्यानंतर देवेंद्र शर्मा किडनी ट्रान्सप्लांट टोळीत सामील झाला. त्याने सात लाख प्रति ट्रान्सप्लान्टच्या दराने 125 ट्रांसप्लांट केले. त्याच बरोबर हे लोक टॅक्सीचालकांना ठार मारायचे आणि त्यांची टॅक्सी लुटून न्यायचे. ड्रायव्हरचा मृतदेह कालव्यात फेकून टॅक्सी वापरलेली टॅक्सी म्हणून विकत असे. त्यानंतर 2004 मध्ये तो पकडला गेला आणि 16 वर्षे जयपूर कारागृहात राहिला. त्यानंतर चांगल्या वर्तनासाठी जानेवारी 2020 मध्ये त्याला 20 दिवसांची पॅरोल मिळाली. पण तो निसटला आणि अंडरग्राउंड झाला. नंतर तो दिल्लीतील मोहन गार्डनमध्ये लपून राहिला.येथे तो एका व्यावसायिकाला चुना लावणार होता. पण पोलिसांना त्याच्या येथे असल्याचा सुगावा लागला आणि अखेर तो पकडला गेला.