डॉक्टर ‘डेथ’, जो आपल्या महिला रूग्णांना ‘पुरून’ त्यावर नारळाचं झाड लावायाचा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : महाराष्ट्रातील सातारा येथून डॉक्टरच्या प्रतिमेला काळिमा फासणारी खळबळजनक माहिती समोर आली आहे. एक अंगणवाडी सेविका अचानक गायब झाली. कुटुंबाच्या संशयावरून चौकशी केली असता पोलिसांना त्या बेपत्ता महिलेचा मृतदेह संतोष पोळच्या अंगणात पुरलेला सापडला. मंगल जेधे असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान, संतोषचा हा पहिला गुन्हा नव्हता. त्याने आतपर्यंत सुमारे 22 खून केले असल्याची धक्क्कादायक माहिती समोर आली आहे, दरम्यान केवळ 6 खून झाल्याचे सिद्ध झाले आहे.

होमिओपॅथीची पदवी घेतलेला संतोष पोळ सातारा येथील रहिवासी असून तो आपल्याच महिला रुग्णांची शिकार करीत असत. संतोषने स्वत: ला एमबीबीएम म्हणून सांगत असे, परंतु प्रत्यक्षात त्याच्याकडे इलेक्ट्रोहोमिओपॅथीची पदवी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या व्यतिरिक्त त्याने बऱ्याच मोठ्या रुग्णालयांमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये काम केले होते आणि शस्त्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणार्‍या सर्व औषधांची त्याला चांगली माहिती होती. संतोष उपचारासाठी आलेल्या रूग्णांमध्ये निराधार किंवा सामाजिकदृष्टया एकटे असलेल्या महिला रूग्णांची शिकार करत असे. उपचाराच्या सुरूवातीस तो रुग्णाचा विश्वास जिंकत असे, आणि नंतर उपचारादरम्यान त्यांना एक-एक इंजेक्शन देत असे.

या इंजेक्शनमध्ये succinylcholine हा द्रव्य असे, हे एक प्रकारचे न्यूरो मस्कुलर पैरालिटिक ड्रग आहे स्नायूंना निष्क्रिय करते. हे इतके प्रभावी असे कि, सर्व स्नायू काम करणे थांबवतात आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. याचा डॉक्टर एनेस्थीसिया म्हणून वापर करतात. परंतु याद्वारे रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले जाते जेणेकरून श्वास चालू राहतो. दरम्यान, माथेफिरू डॉक्टर आणि त्याच्या प्रेयसी नर्सला हे माहित होते आणि याचाच उपयोग करत ते महिला रुग्णांना ठार करत असे. दरम्यान, सनकी डॉक्टर महिला रूग्णांना का मारत असे याचा खुलासा अद्याप होऊ शकला नाही.

पहिल्यांदा 2016 मध्ये बेपत्ता महिलेच्या कुटूंबाच्या तक्रारीवरून चौकशी सुरू झाली. पोलिस या बनावट डॉक्टरच्या फार्म हाऊसवर पोहोचले आणि तेथून रिकाम्या हाताने परत येणार होते, तेव्हा शोध पथकातील कुत्र्यांना सुगावा लागला. अंगणातल्या एका नारळाच्या झाडाखाली ते कुत्रे भुंकत होते. पोलिसांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने नारळाच्या झाडास काढले असता बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला. यानंतर डॉक्टराने धक्कादायक खुलासा केला.

त्याने सांगितले की, त्याने अनेक रुग्णांचा बळी घेतला आहे. सर्व रुग्ण ह्या महिला होत्या. संतोषने त्यांना अमली पदार्थांचे इंजेक्शन देऊन ठार केले. मृतदेहाचा वास येऊन कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने आपल्या फार्ममध्ये चिकन फार्म सुरु केले होते. हत्येनंतर डॉक्टर जेसीबीला बोलावून फार्म हाऊसमध्ये नारळाचे झाड लावायचे आहे असे सांगत खड्डा खणत असे. त्यांनतर रात्री मृतदेह पुरून त्यावर नारळाचे झाड लावत असे. यात शंका टाळण्याचा त्याने आणखी एक मार्ग काढला होता.

संतोष स्वत: ला डॉक्टर तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून सांगत असे. अनेक घोटाळे त्याने उघड केले होते. त्यामुळे संपूर्ण गावचे लोक त्याला मानत असे, आणि संशय असूनही पोलिस तपास करण्यास घाबरत असे. विशेष म्हणजे प्रत्येक हत्येनंतर संतोष भ्रष्टाचाराविरूद्ध मोहीम राबवत असे. संतोषच्या या कारनाम्यात त्याची मैत्रीण ज्योती मांढरे जी स्वत: परिचारिका होती त्याला मदत करत असे. या परिचारिकाच्या मदतीने संतोषचे सर्व कारस्थान उघडकीस आले. मृतदेहांबरोबरच डॉक्टरांच्या घरातून ईसीजी मशीन, औषधे आणि आरटीआय कागदपत्रेही सापडली होती, ज्याच्या मदतीने तो भ्रष्टाचाराची प्रकरणे शोधून काढत असे, जेणेकरून आपली कारस्थाने तो समाजसेवक लपवत असे. संतोष पोळ सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, परंतु त्याच्यावर किती खुनांचा गुन्हा सिद्ध झाला, हे अद्याप समोर आले नाही.