तब्बल 23 वर्षांनंतर पडद्यावर वापसी करणार ‘ही’ मालिका ! ‘रामायण’ला देईल का ‘टक्कर’ ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कलर्सनं इंस्टावरून ओम नम: शिवाय या मालिकेचा टीजर रिलीज केला आहे. ही मालिका एका महाकाव्याची गाथा आहे. भगवान शंकराच्या तेजस्वी शाश्वत जीवनावर आधारीत ही मालिका आहे. इतिहासातील अनेक धार्मिक घटना यात पहायला मिळतात. 1997 मध्ये धीरज कुमार यांनी याची निर्मिती केली होती. ही मालिका आता वापसी करणार आहे.

मालिकेबद्दल बोलायचं झालं तर या मालिकेत समर जय सिंह यांनी शंकराची भूमिका साकारली होती. यशोधन राणा यांनी कामा आणि गायत्री शास्त्री यांनी पार्वतीची भूमिका साकारली होती. याशिवाय मनजीत कुल्लर यांनी सती, संदीप मेहता यांनी नारद, अमित पचौरी यांनी विष्णु आणि सुनील नागर यांनी ब्रह्मा अशा भूमिका साकारल्या होत्या.

वायकॉम 18 च्या हिंदी मास एंटरटेनमेंटच्या चीफ कंटेट ऑफिसर मनीषा शर्मा म्हणतात, “या अभूतपूर्व काळात प्रेक्षक जास्त करून पौराणिक शो पहात आहेत. कारण याचा लोकांवर खूप सकारात्मक प्रभाव आहे. सध्या जय श्री कृष्णा, महाभारत, करमफल दाता शनी या मालिका खूप पाहिल्या जात आहेत. BARC रेटींगमध्ये त्या दिसत आहेत. याच मालिकांसोबत आता आम्ही ओम नम: शिवाय ही मालिका वापस आणणार आहोत. अशा कथांनी समृद्ध होण्यासाठी आता नव्या पिढीलाही एक संधी आहे.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like