सिरियल रेपिस्टची वसई विरारमध्ये दहशत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, ठाणे शहर, तसेच पालघर जिल्ह्यातील मुलींना एक नराधम आपली शिकार बनवत आहे. अल्पवयीन मुलींचा विनयभंग तसेच बलात्कार करणारा सिरियल रिपिस्टने आता आपला मोर्चा वसई, विरार कडे वळवला आहे. त्यामुळे वसई, विरार मध्ये सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22a8419a-be3b-11e8-8d16-2b262da105ef’]

आता हा सीरिअल रेपिस्ट वसई, विरार आणि नालासोपारा या भागात दाखल झाला आहे. चार दिवसात नालासोपाऱ्यातील दोन मुलींना त्याने आपले शिकार बनवलं आहे. याबाबत तुलिंज पोलीस ठाण्यात बलात्कार आणि विनयभंग असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेने परिसरात मात्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. आपल्या मुलींच स्वंरक्षण करण्यासाठी नागरिकांनी आता स्वतःच ‘जागते रहो’चा नारा देत पाहारा करण्यास सुरुवात केली आहे.

रात्रीच्या अंधारातही हातात काठी घेऊन नागरिक पहारा देत असल्याचे दृश्य सध्या वसई, विरार आणि नालासोपारा भागात दिसत आहे. या घटनेचं वृत्त समोर आल्यापासूनच नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. 25 ते 35 वयोगटातील हा वासनांध नराधम 9 ते 14 वर्षे वयोगटातील लहान मुलींवर पाळत ठेवतो. तो मुलींच्या मागे जातो व तुझ्या वडिलांनी मला तुला घ्यायला पाठवलं आहे, तुझ्या वडिलांचं पार्सल आलं आहे, असे सांगुन मुलींना तो आपल्या सोबत घेऊन जातो.

पुणे/दौंड : जमिनीच्या वादातून आठ जणांवर गुन्हा दाखल

मुलींना निर्जनस्थळी नेऊन हा नराधम अतिप्रसंग करतो. सध्या त्याच्यावर नवी मुंबईत सहा, मुंबईत एक, ठाणे शहरात एक, ठाणे ग्रामीण येथे दोन, तर पालघर जिल्ह्यात दोन असे विनयभंग व बलात्काराचा संशयीत आहे. चार दिवसात घडलेला दोन घटना पालघर जिल्हयातील तुलिंज पोलीस ठाण्याच्या घडल्या आहेत.

[amazon_link asins=’B075KK63FC,B00YMY3PX4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e99967e-be3c-11e8-b354-27ee1a73dd3e’]

You might also like