गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयात नोकरीची संधी, जाणून घ्या पगार किती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कायद्याचे पदवीधर (Law graduate) असलेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयाने (Serious Fraud Investigation Office Recruitment) भरतीची अधिसूचना जारी केली असून यंग प्रोफेशनल (लॉ), कनिष्ठ सल्लागार (Law), वरिष्ठ सल्लागार (Law). या पदांकरिता अर्ज मागवले आहेत. याकरिता एकूण 66 जागांसाठी भरती होणार आहे. इच्छूक अन् पात्र उमेदवारांनी 2 रा मजला, परवान भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, दिल्ली 110003 या पत्त्यावर अर्ज पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Join our WhatsApp Group,Telegram, facebook page and Twitter for every update

1) भरली जाणारी पदे
1) यंग प्रोफेशनल (लॉ) – एकूण जागा -13
2) कनिष्ठ सल्लागार (कायदा) – एकूण जागा -14
3) वरिष्ठ सल्लागार (कायदा) – एकूण जागा- 39

2) शैक्षणिक पात्रता
1) यंग प्रोफेशनल (लॉ) : या पदासाठी कर्तव्यदक्ष एक कायदा पदवीधर असणे गरजेचे आहे.
उमेदवारांना एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
तसेच कॉर्पोरेट कायद्याच्या क्षेत्रात इतर तपास यंत्रणांमध्ये आणि नियामक संस्थांमध्ये संपर्क असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

2) कनिष्ठ सल्लागार (कायदा) : या पदासाठी कर्पोरेट कायद्याच्या क्षेत्रात इतर तपास यंत्रणेत आणि नियामक संस्थांमध्ये संपर्क असणे आवश्यक आहे.
तसेच प्राधान्याने 3 ते 8 वर्षांचा अनुभव असावा.

3) वरिष्ठ सल्लागार : या पदासाठी मुख्यतः 8-15 वर्षांचा वकिलीचा अनुभव असावा.
तसेच प्राथमिक तपास यंत्रणेत आणि नियामक संस्थांमध्ये, विशेषत: कॉर्पोरेट कायद्याच्या क्षेत्रात संपर्क असावा.

PM Modi | पीएम मोदींची फ्रंटलाइन वर्कर्संना मोठी भेट ! सुरू केले 6 क्रॅश कोर्स, रोजगाराची नवीन संधी मिळणार, जाणून घ्या

3) दरमहा मिळेल इतका पगार
यंग प्रोफेशनल (लॉ) – 60,000 हजार दरमहा
कनिष्ठ सल्लागार (कायदा) – शैक्षणिक पात्रतेनुसार 80,000 ते 1 लाख 45 हजार
वरिष्ठ सल्लागार (कायदा) – शैक्षणिक पात्रतेनुसार 1 लाख 45,000 ते 2 लाख 65,000 हजार

4) नोकरीचे ठिकाण – दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद राहणार आहे.

Join our WhatsApp Group,Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Serious Fraud Investigation Office Recruitment jobs in serious fraud investigation office

हे देखील वाचा

School Leaving Certificate | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 172 नवीन रुग्ण, 253 रुग्णांना डिस्चार्ज

bhaichand hirachand raisoni माझी चौकशी राजकीय हेतूने नव्हती, तर बीएचआरची राजकीय कशी ?