सावधान! सर्व कामं सोडून आत्ताच अपडेट करा तुमचे Google Chrome, धोक्याचे सावट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक चिंतेची बाब आहे. गुगल क्रोममध्ये एक मोठी त्रुटी आली आहे, ज्यामुळे तुमचा PC किंवा Mac ला धोका आहे. या धोक्यापासून बचाव करण्यासाठी गुगलने क्रोमचे लेटेस्ट अपडेट व्हर्जन सादर केले आहे. गुगल क्रोमचे हे नवे स्टेबल व्हर्जन 80.0.3987.122 आहे, जे विंडोज, मॅक ओएस आणि ल्यूनक्स युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जर तुम्ही सुद्धा क्रोम वापरत असाल तर लवकरात लवकर नवे अपडेट इन्स्टॉल करून त्रुटी दुरूस्त करून घ्या. कारण गुगलने क्रोममधील त्रुटी ट्रॅक करून यावर उपाय केला आहे. हॅकर्सने या त्रुटीचा खुप प्रमाणात फायदा उचलला आहे.

गुगलने या त्रुटीला दुजोरा देताना ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, क्रोम 80 मध्ये मोठ्या त्रुटी आढळून आल्या आहेत. यामध्ये अशा अडचणी आहेत, ज्यामुळे जावास्क्रिप्टला हॅक केले जाऊ शकते आणि हॅकर्स पीसीमध्ये अनरिस्ट्रीक्टेड कोडसुद्धा रन करू शकतात.

असे अपडेट करा पीसी, ल्यूनक्स, मॅकओएस
1. सर्वप्रथम Chrome Web browser वर जा.

2. त्यानंतर About Chrome वर जाऊन update to download आणि install ला Allow करावे लागेल.

3. वेब एक्सेससाठी बहुतांश युजर Chrome चा वापर करतात. यामुळे हा बग करोड़ो लोकांच्या डाटा धोक्यात टाकत आहे.