सीरम इन्स्टीट्यूटचा दावा – ‘ऑक्सफोर्डची कोरोना वॅक्सीन पूर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक’

नवी दिल्ली : जगातील दिग्दज वॅक्सीन उत्पादक कंपनी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने गुरुवारी दावा केला की, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेका कंपनीच्या सहयोगाने विकसित कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक आहे. कंपनीने हा सुद्धा दावा केला की, मानकांनुसार लसीची चाचणी भारतात सुद्धा सुरू आहे.

एसआयआयने लोकांना धैर्य कायम ठेवण्याचे आवाहन करताना म्हटले की, लस सर्वात खराब कामगिरीतही 60-70 टक्के परिणामकारक आहे. या प्रायोगिक कोरोना लसीच्या उत्पादनात त्रुटीच्या बातम्या समोर आल्यानंतर लोक याच्या सुरूवातीच्या परिणामांवरून प्रश्न उपस्थित करत आहेत.

यापूर्वी एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्डने दावा केला होता की, त्यांनी तयार केलेल्या वॅक्सीन खुप परिणामकारक आहेत. परंतु, कंपनीने हे सांगितले होते की, काही सहभागींना पहिल्या डोसमध्ये लसीची तेवढी जास्त मात्रा का दिली गेली नाही, जेवढी अगोदर प्रस्तावित होती.

ऑक्सफोर्डचा ही लस अर्ध्या डोसमध्ये 90 टक्के परिणामकारक आढळली. तर पूर्ण डोस दिल्यावर 62 टक्के परिणामकारक ठरली होती. यावर मात्र शास्त्रज्ञांच्या गटांनी प्रश्न सुद्धा उपस्थित केले आहेत, जे अनुत्तरीत आहेत. परंतु, एस्ट्राजेनेकाने या वेगळ्या परिणामामागील चूक सार्वजनिक केली आहे. नेचर जर्नलने एस्ट्राजेनेकाचे व्हाईस प्रेसीडेंट (बायोफार्मास्युटिकल-रिसर्च अँड डेव्हलपमेंट) मेने पेनालोस यांच्या संदर्भाने म्हटले की, चांगले निकाल एका चूकीचे परिणाम आहेत. एप्रिलच्या अखेरीस जेव्हा या लसीची चाचणी सुरू झाली तेव्हा आढळले की, ज्या लोकांना लस देण्यात आली आहे, त्यांच्यामध्ये डोकेदुखी, थकवा आणि हातांमध्ये वेदनांच्या तक्रारी अपेक्षेपेक्षा कमी होत्या. शास्त्रज्ञांना याचे कारण समजले नाही. यासाठी सुरूवातीपासूनचे चाचणीचे आकडे तपासले गेले.

You might also like