सिगारेट-तंबाखूची सवय असणार्‍यांना कोरोनाचा धोका कमी आहे का? वाचा काय म्हणतोय सर्वे रिपोर्ट

नवी दिल्ली : स्मोकिंग करणारे आणि शाकाहारी लोकांमध्ये सेरो-पॉझिटिव्हिटीचा स्तर कमी आहे. तर, ओ ब्लड ग्रुपचे लोक कोरोना व्हायरस प्रति कमी संवेदनशील असू शकतात. हे कौन्सिल ऑफ सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर)च्या एका पॅन-इंडिया सेरो सर्वेतून समोर आले आहे. या स्टडीत सार्स-कोव्ह-2 विरूद्ध मनुष्याच्या शरीरात तयार होणार्‍या अँटीबॉडीचा शोध घेण्यात आला. हे सुद्धा शोधण्यात आले की, कोणत्या व्यक्तीला कोविड-19 आजाराने संक्रमित होण्याची किती रिस्क आहे.

140 डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांद्वारे करण्यात आलेल्या या स्टडीत 10,427 प्रौढांना सहभागी करण्यात आले होते. या सर्वेत सहभागी झालेले सर्व लोकांमध्ये सीएसआयआरच्या 40 लॅबोरेटरीज आणि इतर सेंटर्समध्ये काम करणारे लोक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य होते. सर्वे परिणामांवरून समजले की, कोविड-19 जरी श्वासाशी संबंधीत आजार असला तरी स्मोकिंग करणार्‍या लोकांना यातून काही मर्यादेपर्यंत मदत मिळत आहे.

स्मोकिंग, निकोटिनबाबत सविस्तर संशोधनाची गरज
कारण स्मोकिंगमुळे म्युकसचे प्रॉडक्शन जास्त प्रमाणात होते. मात्र, या सर्वे रिपोर्टमध्ये इशारा देण्यात आला आहे की, कोरोना व्हायरस संसर्गाबाबत स्मोकिंग आणि निकोटिनच्या परिणामावर वेगळ्याप्रकारे सविस्तर संशोधन करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये जोर देऊन लिहिले गेले की, आरोग्यासाठी धुम्रपान हानिकारक असल्याचे सांगितले जाते आणि यामुळे मनुष्यात अनेक प्रकारचे गंभीर आजार होतात. यामुळे हा स्टडी स्मोकिंगच्या समर्थनात नाही.

शाकाहारी लोकांमध्ये जास्त क्षमता
पीटीआयने आपल्या एका रिपोर्टमध्ये या स्टडीच्या संदर्भाने सांगितले की, फायबर युक्त शाकाहारी भोजन करणार्‍या लोकांमध्ये कोविडविरूद्ध प्रतिकारशक्ती जास्त आहे.

एबी ब्लड ग्रुपमध्ये सर्वात जास्त सेरो-पॉझिटिव्हिटी
या सर्वेत समजले की ओ ब्लड ग्रुपचे लोक या संसर्गाप्रति कमी संवेदनशील आहेत. तर, बी आणि एबी ब्लड ग्रुपचे लोक संक्रमित होण्याचा धोका सर्वात जास्त आहे. यापूर्वी फ्रान्स, इटली, चीन आणि न्यूयॉर्कच्या अशाच स्टडीत स्मोकिंग करणार्‍यांमध्ये कोविड-19 संसर्ग दर कमी आढळून आला. चीनच्या केस स्टडीमध्ये समजले की, तिथे एकुण रूग्णांपैकी केवळ 3.8 टक्के रूग्णच अगोदर स्मोकिंग करत होते.