फायजर-मॉडर्नानंतर आता सीरमने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोविशील्ड व्हॅक्सीनची मॅन्यूफॅक्चरर कंपनी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया ( serum institute ) ने सुद्धा सरकारकडून नुकसान भरपाईच्या जबाबदारीतून सूट देण्याची मागणी केली आहे. सीरमच्या सूत्रांनी गुरुवार म्हटले की, केवळ सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (serum institute ) च नव्हे, जर परदेशी कंपन्यांना सुद्धा याची परवानगी दिली जाते तर सर्व व्हॅक्सीन कंपन्यांना नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर सूट दिली पाहिजे.

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी बुधवारी संकेत दिला आहे की, सरकार भारतात लसींसाठी मंजूरीत वेग आणण्यासाठी फायजर आणि मॉडर्नाला नुकसान भरपाईच्या जबाबदारीत सूट देऊ शकते. सरकारच्या एका प्रमुख अधिकार्‍याने बुधवारी म्हटले होते की, भारतात फायजर आणि माडर्नाला नुकसान भरपाई देण्यात काहीच समस्या नाही.

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

डीसीजीआयने केली सवलतीची घोषणा

यापूर्वी बुधवारी भारताचे प्रमुख औषध नियामकाने केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कसौली द्वारे परदेशात निर्मित कोविड-19 रोधी लसीची चाचणी करणे आणि अशा कंपन्यांसाठी लसींचा वापर सुरूझाल्यानंतर ब्रिजिंग ट्रायल करण्याच्या अनिवार्यतामध्ये सूट दिली आहे. ज्यामुळे लसीची उपलब्धता वाढेल. भारताच्या औषध महानियंत्रकांचा हा निर्णय फायजर तसेच सिप्ला सारख्या कंपन्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आला आहे.

त्यांनी भारताकडे आयात लसीच्या पुरवठ्यासाठी केलेल्या चर्चेच्या दरम्यान ही मागणी केली होती. अजूनपर्यंत कोणत्याही परदेशी कंपनीला भारतात कोरोना व्हायरस प्रतिबंधक लस सुरू करण्यापूर्वी ब्रिजिंग ट्रायल करावी लागत होती.

यामध्ये मर्यादित संख्येत स्थानिक स्वयंसेवकांवर लसीचा प्रभाव आणि सुरक्षा तपासली जाते. डीसीजीआयनुसार, भारतात अलिकडेच कोविड-19 ची प्रकरणे प्रचंड वाढल्याने लसीची मागणी तसेच देशाची गरज पूर्ण करण्यासाठी आयात लसींची उपलब्धता वाढवण्याची आवश्यकता पाहता ही सूट दिली आहे.

त्यांनी म्हटले, आपत्कालीन स्थितीत मर्यादित वापरासाठी भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसींना मान्यता देण्याचा निर्णय घेतला जातो. अशा लसींना मंजूरी दिली जाते ज्या अमेरिकन एफडीए, ईएमए, यूके एमएचआरए, पीएमडीए जपान द्वारे मान्यप्ताराप्त आहे किंवा डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन वापराच्या यादीत सुचीबद्ध आहे आणि ज्यांचा वापर अगोदर लाखो लोकांवर करण्यात आलेला आहे. सीडीएल, कसौली द्वारे लसीची चाचणी करणे आणि ब्रिजिंग ट्रायलमधून सूट दिली जाऊ शकते.

READ ALSO THIS :

कोरोनाबाबत अमेरिकन ‘महामारी’ तज्ज्ञ अँथनी फाउची आणि बिल गेट्सवर यांच्यावर संशय ! चीनी शास्त्रज्ञा सोबत चर्चेचा ईमेल ‘लीक’

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे