Coronavirus : ऑक्सफोर्डनं वॅक्सीनच्या ट्रायलबद्दल दिली खुशखबर, ‘सीरम’च्या CEO यांनी सांगितली ही माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जग ज्या कोरोना व्हायरस वॅक्सीनची प्रतिक्षा करत आहे, त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वॅक्सीनची ट्रायल ब्रिटनमध्ये एक वॉलंटियर आजारी पडल्यानंतर रोखण्यात आली होती. चांगली बाब ही आहे की, ट्रायल पुन्हा सुरू करण्यात येत आहे. यासंदर्भात ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे वक्तव्य समोर आले आहे. यानंतर सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे सुद्धा वक्तव्य समोर आले आहे.

शनिवारी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, ऑक्सफर्ड कोरोना वॅक्सीनची ट्रायल ब्रिटनच्या सर्व चाचणी केंद्रामध्ये पुन्हा सुरू करण्यात येईल. जागतिक स्तरावर सुमारे 18,000 लोकांनी वॅक्सीन घेतली आहे. अशाप्रकारच्या मोठ्या चाचण्यांमध्ये ही अपेक्षा केली जाते की, काही सहभागी व्यक्ती अस्वस्थ होऊ शकतात. यासाठी सुरक्षेचे सावधगिरीने मुल्यमापन केले पाहिजे.

यानंतर भारतात ऑक्सफर्ड वॅक्सीन विकसित करणार्‍या पुणे येथील सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाकडून सुद्धा वक्तव्य जारी करण्यात आले आहे. सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारीच ट्विट करून सांगितले की, जसे की मी पूर्वी सांगितले होते की, ट्रायल पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचा निष्कर्ष काढू नये. नुकत्याच घडलेल्या घटनेवरून हे स्पष्ट होते की, आमची प्रक्रियेबाबत कोणतीही धारणा नाही. कारण शेवटच्या टप्प्यापर्यंत याचा सन्मान केला पाहिजे. ही एक चांगली बातमी आहे.