सिरम इन्स्टिट्युट ‘कोरोना’ लसीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार

पोलिसनामा ऑनलाईन – भारतातील नावाजलेल्या सिरम इन्स्टिट्युटकडून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करणार आहे. सीरम आणि गावी यांनी कोरोनावरची जी लस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे त्या लशीचे 10 कोटी अतिरिक्त डोस तयार करण्यात येणार आहेत. लस निर्मितीच्या प्रक्रियेत बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचाही वाटा असणार आहे.

कोरोनाचा फैलाव रोखणार्‍या लशीच्या निर्मिती संदर्भात सिरमने फक्त ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासह जगातील वेगवेगळया लस संशोधन करणार्‍या संस्थांबरोबर करार केले आहेत. सध्या भारतात सिरमकडून ऑक्सफर्डने बनवलेल्या लशीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. सिरमने अस्त्राझेनेकाप्रमाणेच अमेरिकन बायोटेक कंपनी कोडेजेनिक्स बरोबरही लस निर्मितीचा करार केला आहे. पुणे येथील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्यावतीने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेकासोबत कोरोनावर लस विकसीत करण्यात येत आहे. सिरम ही संस्था जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती करणार्‍या संस्थांपैकी एक आहे.