SII चे CEO अदर पूनावाला पॅनिसिया बायोटेकमधून बाहेर पडले, 118 कोटींला विकली संपुर्ण हिस्सेदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सोमवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. अदर पूनावला यांनी पॅनेसिया बायोटेक मधील आपला 5.15 टक्के हिस्सा खुल्या बाजारात करण्यात आलेल्या व्यवहारांतर्गत विकला आहे. या व्यवहरातून अदर पूनावाला यांना 118 कोटी रुपे मिळाले आहेत.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हे सर्व शेअर्स SII म्हणजेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने खरेदी केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीप्रमाणे अदर पूनावाला यांनी पॅनेसिया बायोटेकचे 31,5,7,034 शेअर्स 373.85 रुपये प्रति शेअर भावाने विकले आहे. यामधून त्यांना 118.02 कोटी रुपये मिळाले आहेत. हे शेअर्स याच भावात एका निराळ्या व्यवहाराद्वारे SII ने खरेदी केले आहेत. पॅनेसियाच्या मार्च 2021 च्या शेअर होल्डिंगच्या आकडेवारीनुसार पूनावाला आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीत अनुक्रमे 5.15 आणि 4.98 हिस्स्यासह सर्वजनिक शेअरधारक होते.

शारदा माइन्सकडूनही शेअर्सची विक्री

दुसऱ्या एका व्यवहारामध्ये शारदा माइन्सनं जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडचे 227.66 कोटी रुपये मूल्याच्या शेअर्सची विक्री केली. कंपनीच्या 52.74 लाख शेअर्सची 431.62 रुपये प्रति शेअर्स या दराने विक्री करण्यात आली. सोमवारी जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडच्या शेअरचे दर 4.65 टक्क्यांनी वाढून 436.55 रुपये प्रति शेअरवर बंद झाला होता.