Service Charge in Hotels and Restaurants | केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! हॉटेल, रेस्टॉरंटमधील सक्तीच्या सेवा शुल्क वसुलीवर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Service Charge in Hotels and Restaurants | हॉटेल व रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्जबाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जच्या (Service Charge in Hotels and Restaurants) नावाखाली ग्राहकांकडून शुल्क आकरले जात होते, आता त्यामध्ये दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकारणने (CCPA) या संबंधी निर्देश जारी केले आहेत.

 

केंद्रीय ग्राहक हक्क संरक्षण प्राधिकरणानं हॉटेल व रेस्टॉरंटकडून केल्या जाणाऱ्या सेवा शुल्क वसुलीसंदर्भात (Service Charge in Hotels and Restaurants) मोठा निर्णय घेतला. सेवा शुल्क वसुलीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. सीसीपीएच्या निर्णयानुसार कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकांना सेवा दिल्याबद्दल त्यांच्याकडून सेवा शुल्क वसुली करु शकत नाही. जर एखाद्या ग्राहकाकडून सेवा शुल्क वसूल करण्यात आल्यास त्याची तक्रार ग्राहकाला आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीनं सादर करता येणार आहे. edaakhil.nic.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवता येणार आहे.

 

सीसीपीएनं सेवा शुल्कावर बंदी घालण्याचा निर्णय घेताना तो चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. ग्राहक मंत्रालयाच्या (Union Consumer Affairs Ministry) अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय ग्राहक प्राधिकरणाने हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या दरांमध्येच त्याचा समावेश असतो, असं म्हटलं होतं. ग्राहक या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करु शकतात. तक्रारीच्या तपासणीनंतर ती पुढे सीसीपीएकडे पाठवली जाऊ शकते.

 

सीसीपीएनं यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांकडून 5 ते 15 टक्क्यांपर्यंत सेवा शुल्क आकारलं जातं.
हॉटेलमध्ये 5 टक्के जीएसटी (GST) आणि रेस्टॉरंटमध्ये 18 टक्के जीएसटी आकारली जाते.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी रेस्टॉरंटमध्ये कोणत्याही पदार्थांच्या बिलावर जबरदस्तीने सेवा शुल्क आकारता येणार नसल्याचे म्हटले.
सेवाशुल्क ग्राहकांसाठी वैकल्पिक असेल. रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांना चांगल्या सेवा आणि सुविधा द्याव्यात असं वाटत
असेल तर त्याचा भार ग्राहकांवर टाकला जाऊ नये, असेही गोयल यांनी म्हटले. सेवाशुल्क आकारणीला मनाई केल्यामुळे खाद्यपदार्थांच्या किंमत वाढू शकतात.

 

Web Title :- Service Charge In Hotels and Restaurants | hotels restaurants can not force customers to pay service charges ccpa issues guidelines

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gulabrao Patil | ‘आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात’, गुलाबरावांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

 

CM Eknath Shinde | विधान परिषद निवडणुकीदरम्यान असं काय घडलं? आमदार सोबत कसे आले? – एकनाथ शिंदे

 

Monsoon Health Tips | मान्सूला झाली सुरुवात, चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, बिघडू शकते तब्येत