चेन स्नॅचिंग करून धूमाकूळ घालणाऱ्या ५ जणांच्या टोळीला सक्तमजूरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात सोनसाखळी आणि मंगळसुत्र हिसकावून धूमाकूळ घालणाऱ्या टोळीतील ५ जणांना पुणे सत्र न्यायालयाने १० वर्षेसक्त मजूरी आणि १ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सज्जाद गरीबशा पठाण उर्फ इराणी (वय ३०), मुस्तफा फत्ते इराणी (वय ३०), शब्बीर मिस्कीन शेख उर्फ इराणी (वय २४), अलिम शकील पठाण (वय २१, चौघेही रा. श्रीरामपूर जि. अहमदनगर) सलीम अब्दुल (वय ३२, रा. भुसावळ, जि. जळगाव) अशी पाच जणांची नावे आहेत. याप्रकरणी भवानी पेठेतील ५३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती.

३० मार्च २०१४ रोजी फिर्यादी महिला या भवानी पेठेतील नेहरू रस्त्यावरून पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावण्यात आली होती. दुचाकी आणि स्विफ्टमधून आलेल्यांनी त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावून घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकऱणी पाचजणांना अटक करून तपास केला. तेव्हा त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते त्यांतर न्यायालयाने काल यावर सुनावणी करत त्यांना १० वर्षे सक्तमजूरी आणि प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.