तिळाच्या गुणधर्मीय पदार्थांबराेबर तेलाने मधुमेहासारख्या आजारावर मिळवा’कंट्रोल’, जाणून घ्या पध्दत

पोलीसनामा ऑनलाइन – तीळ ( Sesame) हा खूप गुणधर्म असणारा पदार्थ आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीतदेखील तिळाला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीसारखा ( Makarsankrant ) सण तर केवळ तीळ आणि तिळाच्या पदार्थांनी साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी बहुतेक तिळाचे पदार्थ बनविले जातात. तिळाच्या पदार्थांप्रमाणेच तिळाचे तेलही आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. तिळाच्या तेलाचा प्रामुख्याने मधुमेहाच्या ( Diabetes) रुग्णांना मोठा फायदा होतो.

भारतात मोठ्या प्रमाणात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या असून, जवळपास सात कोटी लोक मधुमेहग्रस्त आहेत. ही संख्या वरचेवर वाढतच आहे. जर आहारात तिळाच्या तेलाचा अधिकाधिक वापर केला, तर मधुमेहावर नियंत्रण मिळविता येऊ शकते. तिळाचे मोठ्या प्रमाणात भारतात उत्पादन होते. जगभरातील उत्पादन होणाऱ्या तिळामध्ये भारताचा ( India) वाटा खूप मोठा आहे. त्यामुळे तिळाच्या तेलाचा वापर मधुमेहग्रस्तांनी नियमित केला पाहिजे, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, तिळाच्या तेलामध्ये ई जीवनसत्त्व ( E- Vitamin) आणि लिगनॅन्स ही अ‍ॅण्टीऑक्‍सिडेंट विपूल प्रमाणात असते. टाइप-टू मधुमेह रुग्णांसाठी हे घटक उपयुक्त असतात. तिळाच्या तेलाचे नियमित सेवन केल्यास अनेक विकारांचे निर्मूलन होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्ही या तिळाच्या तेलाचा वापर करत नसाल, तर तुम्ही या तेलाचा वापर करून मधुमेहापासून सुटका होऊ शकते.