निर्भया गँगरेप केस ! 4 दोषींच्या विरोधात ‘डेथ वॉरंट’ जारी करणार्‍या न्यायाधीशांची बदली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषींना डेथ वॉरंट जारी करणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोडा यांची बदली करण्यात आली आहे. न्यायाधीश अरोडा यांची नियुक्ती आता अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सतीश अरोडा यांनी निर्भया दिल्ली प्रकरणातील आरोपींना डेथ वॉरंट जारी केले होते.

निर्भया प्रकरणातील चार दोषी मुकेश, अक्षय, विनय, पवन यांच्या फाशीच्या शिक्षेची घोषणा करण्यात आली आहे. मागील एका महिन्यात चार दोषींच्या विरोधात दोनदा डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. पहिल्यांदा 22 जानेवारी 2020 ला फाशी होणार होती परंतु दोषी विनयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर फाशीची तारीख बदलण्यात येऊन 1 फेब्रुवारी 2020 करण्यात आली.

पुढे ढकलण्यात आली फाशीची तारीख –
निर्भयाचे दोषी फाशी टाळण्यासाठी सतत काही ना काही प्रयत्न करताना दिसत आहेत. दोषी विनयकडून पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली, त्यानंतर दोषी मुकेशने याचिका दाखल केली परंतु या याचिका फेटाळण्यात आल्या. मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली होती परंतु ही याचिका देखील रद्दबातल ठरवण्यात आली. सतत याचिका दाखल होत असल्याने फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

दोषींना विचारण्यात आली अंतिम इच्छा –
तिहार तुरुंग प्रशासनाने चारही दोषींना फाशी देण्याचा तयारी सुरु केली आहे. प्रशासनाने चारही दोषींना आपली अंतिम इच्छा विचारली. प्रशासनाने विचारले की फासावर जाण्यापूर्वी तुम्हाला शेवटचे कोणाला भेटायचे आहे. तुमच्या नावे एखादी मालमत्ता किंवा बँक खात्यात पैसे असतील तर ते कोणाच्या नावे ट्रांन्सफर करु इच्छित आहात का?

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like