रामराजेंच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा ; पण भाजपकडून ‘राजें’ना दे ‘धक्का’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे पक्षातील नाराजीमुळे शिवसेनेत जाणार, अशा चर्चांना उधाण येत आहे. त्यात आता रामराजेंना शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपकडूनच धक्का बसण्याची शक्यता वाढली आहे. कारण भाजप रामराजे निंबाळकर यांच्याविरोधात विधानपरिषदेत अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता आहे.

राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यात राज्य सरकारने विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बजेट सादर केले. त्यावर सादर केलेला अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप विरोधकांनी केला. यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरांवर आरोप केला. विधानपरिषदेत रामराजे सत्ताधारी आणि विरोधकांत दुजाभाव करतात, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. तसंच यावेळी चद्रकांत पाटलांनी रामराजेंविरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबतही भाष्य केलं. त्यांच्या वक्तव्यानुसार भाजपने जर अविश्वास ठराव मांडला तर रामराजेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकांमंध्ये काँग्रेस, राष्ट्रावादीला पराभव स्वीकारावा लागला. त्यात त्यांचे संख्याबळ थोडे नाही तर चांगलेच घसरले आहे. त्यात रामराजेंविरोधात ठराव आला तर रामराजे यांना विधानपरिषद सभापती म्हणून आपलं पद कायम राखणं कठीण होऊ शकतं.

दरम्यान, साताऱ्यात रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच यांचे वाद विकोपाला गेले आहेत. दोन्ही राजेंनी एकमेकांवर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली. या वादाने पक्षातच नाराज असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिल्याची माहिती समोर आली. तसंच आगामी काळात रामराजे शिवसेनेचे शिवबंधन बांधण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय 

मोबाईल आणि कंप्युटरचा जास्त वापर करणाऱ्यांनी अशी घ्यावी “डोळ्याची” काळजी 

जाणून घ्या. कुष्ठरोगा बाबतचे समज-गैरसमज 

 “ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय