महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का ; वैद्यकीय शिक्षणात मराठा आरक्षणाबाबत SC चा ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वैद्यकीय शिक्षणात मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे आता आरक्षण प्रश्न आणखी चीघळण्याची शक्यता आहे. या मुद्यावरून राज्य सरकारच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे.

मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. दरम्यान याप्रकरणी सर्व याचिकांना याचिकाकर्त्यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान द्यावे, असा आदेश दिल्ली सुप्रीम कोर्टाने काढला आहे. अशी माहिती राज्य सरकारचे वकील अॅड. निशांत कातनेश्वरकर यांनी दिली होती. मेडिकल पीजी कोर्सला यंदा मराठा आरक्षण लागू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. अध्यादेशाविरोधातील ही याचिका सुप्रीम कोर्टाने याआधीच फेटाळली होती. यासाठी सुप्रीम कोर्टात येण्याची गरज नव्हती, असंही कोर्टाने फटकारले होतं. कलम ३२ अन्वये हायकोर्टात जाण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्र सरकारने आधी जागा वाढवाव्यात आणि त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असा सल्ला सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थांना दिलासा देण्यासाठी सरकार काय पाऊलं उचलणार, हे आता पाहावं लागेल.