पार्टी रंगात आली असतानाच संपली दारू, लोकांनी तोंडाला ‘लावलं’ हॅन्ड सॅनिटायजर, 7 जणांचा मृत्यू तर दोघे कोमामध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरस महामारीचा प्रकोप संपूर्ण जग सोसत आहे. अशावेळी हँड सॅनिटायजर आणि मास्क वेगाने लोकांच्या जीवनात महत्त्वाचा भाग बनले आहे. कोराेनापासून वाचण्यासाठी हँड सॅनिटायजर आणि मास्कचा प्रयोग जवळपास संपूर्ण जग करत आहे. हँड सॅनिटायजरचा वापर हात स्वच्छ करण्यासाठी केला जातो. परंतु, जर कुणी हे प्यायले तर…

होय, असेच एक प्रकरण रशियाच्या एका गावात घडले आहे. येथे पार्टीत दारू संपल्यानंतर लोकांनी हँड सॅनिटायजर प्यायले. ग्रामस्थांची ही चूक इतकी महागात पडली की, सॅनिटायजर प्यायल्याने 7 लोकांचा मृत्यू झाला, तर 2 लोक कोमात गेले. ऐकण्यास थोडे हे अजब वाटत असले तरी अल्कोहाेलच्या व्यसनामुळे या गावातील लोकांनी हे भयंकर पाऊल उचलले.

मागील काही महिन्यांमध्ये हँड सॅनिटायजर प्यायल्याने जीव गमावल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हँड सॅनिटायजरचा वापर लोक आपला जीव वाचवण्यासाठी करत आहेत, परंतु काही लोकांच्या मूर्खपणामुळे हे लोक लोकांचे जीवन हिसकावण्याचे काम करत आहेत. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू आहे.

You might also like