राज्यातील 7 सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आज अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यावर अनेक ठिकाणी बदल्या होणार हे निश्चित झाले होते. अधिकाऱ्यांमध्ये देखील याबाबात चर्चा सुरु होती. त्यानंतर आज महाविकासआघाडीच्या सरकारकडून 7 सनदी अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या.

१) डॉ. बी. ए. गगराणी यांची मंत्रालयात मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२) विकास खारगे यांची वन खात्याचे प्रधान सचिवपदावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

३) सचिन कुर्वे यांची महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

४) निपुण विनायक यांची पालिका प्रशासनाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आले आहे.

५) आनंद रायते यांची विक्री कर खात्याच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

६) अमोल येडगे यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

७) के. एच. बगाटे यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती झाली आहे.

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर ही तिसरी बदली आहे. आतापर्यंत एकूण 12 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Visit : Policenama.com