मुलीने चहात उकळवली मेडिकल प्लांटची पाने अन् कुटुंबातील 7 जण ‘गोत्यात’

शोपियाँ : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरातील शोपियाँ येथे एका मुलीने चुकीने मेडिकल प्लांटची पाने चहामध्ये उकळवली. हा चहा त्या कुटुंबातील सदस्यांनी प्यायला. हा चहा प्यायल्याने एकाच कुटुंबातील सात जण बेशुद्ध झाले आहेत. शोपियाँच्या नबल जवूरा परिसरातील मुलीने मेडिकल प्लांट आर्गेमोन मेक्सिकाना वाटून चहात उकळले होते. त्यानंतर काहीजण बेशुद्ध झाले. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेशही आहे.

मेडिकल प्लांटची पाने चहामध्ये टाकली होती. हा चहा प्यायला. त्यानंतर कुटुंबातील सदस्य बेशुद्ध झाले आहेत. या सर्वांना शोपियाँच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांना श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्वांची प्रकृती ठिक आहे. या प्रकरणानंतर आझाद अहमद, हजीरा बेगम, मोहम्मद अमीन, फरिदा जान, शाबिर अहमद आणि इतर दोघे अल्पवयीन मुले बेशुद्ध झाले आहेत.

सर्वांची प्रकृती स्थिर
मेडिकल प्लांटची पाने चहात उकळली होती. हा चहा प्यायल्याने यातील 7 जणांना त्रास झाला. हे सर्वजण बेशुद्ध झाल्यानंतर या सर्वांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.