माजी IPS अधिका-यासह सात जण अटकेत

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाईन 

 १९९८ मधील अमली पदार्थाशी संबंधित प्रकरणात गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्यासह सात जणांना बुधवारी गुजरात गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.

[amazon_link asins=’B07B6SN496,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cfb4f507-b0fc-11e8-90f8-e5d842eaef66′]

याबाबत अधिक माहिती अशी की , १९९८ मध्ये भट्ट हे बनासकांठाचे पोलीस उपायुक्त होते,  दरम्यान गुजरातमधील पालनपूर येथे संजीव भट्ट यांच्या पथकाने एका वकिलाला अमली पदार्थाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले होते.
गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना बुधवारी गुजरात गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. १९९८ मधील अमली पदार्थाशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून एका वकिलाची फसवणुक केल्याप्रकरणी भट्ट यांच्यासह सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.यानंतर संबंधित तक्रारदाराने न्यायालयाला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. गुजरात हायकोर्टाने या प्रकरणात गुजरात गुन्हे अन्वेषण विभागाला तपास करण्याचे आदेश दिले होते. यानंतर केलेल्या तपासात भट्ट यांनी तक्रारदाराराला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे समोर आले.
याच प्रक्ररणात अखेर पोलिसांनी बुधवारी भट यांच्यासह सात जणांना अटक केली. याच प्रकरणात निवृत्त पोलीस निरीक्षक व्यास यांचा देखील समावेश आहे. दरम्यान सर्व आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

जाहिरात