मेकॅनिक इंजिनियरकडून सात पिस्तूल, १५ काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

बेकायदेशीररित्या शहरात पिस्तूल विक्रीसाठी आणलेल्या एका सराईत गुन्हेगारास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या गुन्हे शाखा युनिटने अटक केली. त्याच्याकडून पाच पिस्तूल आणि १३ जिवंत काडतुसे तर खरेदी करणाऱ्या एकाकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी हा ‘मेकॅनिक इंजीनियर’ झालेला असून तो सराईत गुन्हेगार आहे.

अतिरीक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी आज ही माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी हे होते. अनुप नवनाथ सोनवणे (२८, रा. अंकुश चौक, ओटास्कीम, निगडी) आणि खरेदी करणारा अवधूत जालिंदर गाढवे (२६, रा. मोशी, प्राधिकरण) या दोघांना अटक केली आहे.
निगडी ओटास्कीम परिसरात एकाकडे मोठा शस्त्र साठा असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहायक निरीक्षक गणेश पाटील, दिपाली मरळे, हवालदार प्रमोद वेताळ, कैलास बाबडे, प्रमोद लांडे, राजेंद्र शेटे, प्रवीण दळे, राजेश परंडवाल, आप्पासाहेब कारकुड, महादेव धनगर, दिलीप लोखंडे, अमित गायकवाड, तानाजी गाडे, सुरेंद्र आढाव, किरण चोरगे, संतोष बर्गे, हेमंत खरात, प्रदीप गाडे, प्रमोद हिरळकर, स्वप्नील शिंदे, सुनील चौधरी, गोपाल ब्रह्मदेव यांनी छापा मारला. त्यावेळी सोनवणे याच्या घरात पिस्तुल आणि जिवंत काडतुसे आढळून आली.

धडाकेबाज कारवाई  : लाच घेताना महिला पोलिस कर्मचार्‍याच्या पतीला अटक

त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे पाच पिस्तुल आणि १३ जिवंत काडतुसे आढळून आली. अधिक चौकशी करता त्याने अवधूत गाढवे याला दोन पिस्तुल विक्री केल्याचे स्पष्ट झाले. अवधूत याला ताब्यात घेवून त्याच्याकडून दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. या दोघांना अटक करून एक लाख ९७ हजार ५०० रुपये किंमतीचे सात पिस्तूल आणि १५ काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत.
[amazon_link asins=’B078LVWLJX,B075T1YTR9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dbf20ca3-ab70-11e8-86c8-7b59587a836a’]

अनुप सोनवणे याला यापूर्वीही बेकायदेशीर पिस्तुल खरेदी-विक्री प्रकरणात अटक झालेली आहे. त्याच्याकडून चार पिस्तुल जप्त केली होती. तसेच त्याच्यावर वाहन चोरी, आर्म ऍक्ट, चोरी, विनयभंग आदी गुन्हे दाखल आहेत. तपास गुन्हे शाखा करत आहेत.