U – 19 चे कॅप्टन राहिलेल्या ‘या’ 7 क्रिकेटर्संना टीम इंडियामध्ये कधीच ‘संधी’ नाही मिळाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंडर-19 विश्वकप पुढील 13 दिवसांमध्ये सुरु होणार आहे. मात्र अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी फक्त अंडर-19 विश्वकपच खेळला नाही तर तो विश्वकप जिंकला देखील आहे. परंतु त्यानंतर त्यांना भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही. अशा बारा पैकी केवळ पाचच कॅप्टनला संघात स्थान मिळवता आले आहे आणि बाकी सात जणांना संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. जाणून घेणार आहोत अशाच काहीशा हरवलेल्या खेळाडूंना.

कोहलीने केले रेकॉर्ड
विराट कोहली हे एकमेव असे कॅप्टन आहेत ज्यांनी ज्युनिअर टीम सोबतच सिनिअर टीमचे देखील नेतृत्व केले. 2008 मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली ज्युनिअर टीम चॅम्पियन बनली होती. त्या टीममध्ये रविंद्र जडेजा, मनीष पांडे आणि सौरभ तिवारी देखील होते.

सेंथिलनाथन होता पहिला कॅप्टन
1988 मध्ये एम सेंथिलनाथन यांच्या नेतृत्वात टीमने चांगली कामगिरी केली होती. त्या विश्वकपमध्ये भारतकडून नयन मोंगियाने सात सामन्यांमध्ये 19.28 च्या सरासरीने 135 रण बनवले होते. त्यावेळचे मोंगिया, हिरवानी यांच्यासोबतच प्रवीण आमरे आणि वेंकटेशपति राजू हे देखील ज्युनिअर टीममध्ये खेळले होते.

पगनिस यांना देखील आले अपयश
1998 मध्ये दुसऱ्या अंडर-19 विश्वकपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व मुंबईच्या अमित पगनिस यांच्याकडे होते. यावेळी टीम दुसऱ्या फेरीपर्यंत पोहचली होती. या टीममधील हरभजन सिंह, वीरेंद्र सेहवाग यांना सिनिअर संघात स्थान मिळाले होते. मात्र पगनिस याना नशिबाने साथ दिली नाही.

रविकांत देखील अपयशी
2006 च्या अंडर-19 विश्वकपचे नेतृत्व रायबरेलीचे रविकांत शुक्ल यांनी केले होते. परंतु सिनिअर संघात खेळण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. रविकांत यांची टीम पाकिस्तानकडून पराभूत झाली होती. या संघातील तीन खेळाडूंना पुढे सिनिअर संघात स्थान मिळाले होते. हे खेळाडू चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि पियुष चावला हे होते.

मनेरिया देखील गायब झाले
2010 मध्ये उदयपूर येथून आलेले अशोक मनेरीया संघाचे नेतृत्व करत होते. मात्र त्यांनाही सिनिअर टीममध्ये स्थान मिळवता आले नाही. यावेळी संघात मयंक अग्रवाल, लोकेश राहुल असे खेळाडू देखील होते जे गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत होते.

उन्मुक्त यांची देखील झाली नाराजी
2012 मध्ये अंडर-19 चा विश्वकप जिकणाऱ्या टीम इंडियाचे नेतृत्व उन्मुक्त चांद  यांनी केले होते. फलंदाजीमध्ये देखील त्याने उत्तम कामगिरी केली होती. मात्र यानंतर त्यांना आपल्या खेळात सातत्य दाखवता आले नाही आणि टीम इंडियामध्ये खेळण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.

विजय देखील झाले नाराज
2014 च्या अंडर-19 संघाचा कॅप्टन विजय जोल होता मात्र त्याला देखील सिनिअर संघात स्थान मिळवण्यात यश आले नाही. यावेळी संघात असलेले दोन खेळाडू मात्र आयपीएल मध्ये खूप गाजले त्यापैकी एक होते संजू सॅमसंग आणि दुसरे कुलदीप यादव. विशेष म्हणजे या दोनीही खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले होते.

ईशांत देखील प्रतीक्षेत
2016 च्या विश्वकपमध्ये ईशान किशन यांनी संघाला फायनलमध्ये तर नेले मात्र विजय मिळवण्यात त्यांना अपयश आले. ईशान किशन हे विकेटकिपर फलंदाज आहेत आणि विशेष म्हणजे झारखंड कडून खेळलेले आहेत. मात्र या संघात खेळणारे रिषभ पंत यांना भारतीय संघात स्थान मिळाले मात्र इशांत यांना सिनिअर संघात संधी मिळाली नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/