ब्रॉयलर चिकन खाताय ? आताच जाणून घ्या ‘हे’ 7 गंभीर परिणाम !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जीमला जाणारी लोकं किंवा मांसाहार प्रिय असणारी लोकं प्रोटीन्स जास्त मिळवण्यासाठी चिकन खातात. आजकाल ब्रॉयलर चिकन जास्त खाल्लं जातं. आज आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे की, या प्रकराच्या चिकनची कशी वाढ होते, याचे काय परिणाम होतात.

अशी होती ब्रॉयलर चिकनची वाढ

ब्रॉयलर कोंबड्यांची वाढ वेगानं होण्यासाठी त्यांच्या आहारत मोठ्या प्रमाणावर रसायनं आणि अँटीबायोटीक्स यांचा समावेश केला जातो. त्यामुळं फक्त 40 दिवसातच त्यांची वाढ होते. त्यामुळं कृत्रिम पद्धतीनं वाढवलेल्या कोंबड्यांचं मांस आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. जर तुम्ही वारंवार याचं सेवन करत असाल तर याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.

ब्रॉयलर चिकन खाण्याचे संभाव्य दुष्परिणाम

1) कॅन्सरचा धोका – एक रिसर्चमधून अशी माहिती समोर आली आहे की, जर पोल्ट्रीशी संबंधित पदार्थ सातत्यानं खाल्ले तर कॅन्सरचा धोका वाढतो. संशोधनात असं म्हटलं आहे की, ब्रॉयलर चिकन उच्च तापमानाला शिजवल्यानंतर हा कॅन्सरचा धोका वाढतो. विशेष बाब अशी की, यात पुरुषांना कॅन्सरचा धोका जास्त असल्याचंही संशोधनात सांगितलं आहे. अलीकडे ग्रिल्ड चिकन आवडीनं खाल्लं जातं. यानंही आरोग्याला धोका निर्माण होतो.

2) बॅक्टेरिया –  आपल्याकडे बहुतांश पोल्ट्री फार्म आणि चिकन यात स्वच्छतेचे नियम पाळले जाताना दिसत नाहीत. याचाच परिणाम तुम्ही सेवन करत असलेल्या चिकनवर होतो. त्यामुळं त्यातील बॅक्टेरियामुळं काही किरकोळ आजार होण्याचाही धोका असतो.

3) सिगारेटपेक्षाही धोकादायक –  एका इंग्रजी वृत्तानुसार, ब्रॉयलर चिकनचा एक लेगपीस 60 सिगारेटपेक्षाही धोकादायक असू शकतो. मुळात चिकन जास्त शिजवल्यामुळं त्यातील प्रोटीनची मात्र कमी झालेली असते. त्यामुळं ते हानिकारक ठरतं असही संशोधनात सांगण्यात आलं आहे.

4) फॅट्स –  शरीराला फॅट्सचीही गरज असते. परंतु गुड फॅट्सची. ब्रॉयलर चिकनमधून जे फॅट्स मिळतात ते बॅड फॅट्स असतात. हेच कारण आहे की, जे सतत ब्रॉयलर चिकनचे पदार्थ खातात त्यांना लठ्ठपणा, उच्च रक्तदाब अशा आरोग्याच्या तक्रारी वाढलेल्या दिसतात. त्यामुळं ब्रॉयलर चिकन ऐवजी गावरान चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो.

5) हानिकारक केमिकल्स –  वजनावर चांगला दर मिळावा आणि वेगानं वाढ व्हावी यासाठी ब्रॉयलर कोंबड्यांना आहारासोबतच इंजेक्शन्सही दिले जातात. त्यामुळं त्यांच्य शरीरात अनेक हानिकारक केमिकल्स इंजेक्ट होतात. अशा कोंबडीचं मांस जर आपण खाल्लं तर याच केमिकल्सचा आपल्या शरीरात प्रवेश होतो. यामुळं लठ्ठपणा, पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता कमी होणं, मुलीमध्ये वयात येण्याविषयीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

6) अँटीबायोटीक्स –  ब्रॉयलर चिकनच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर अँटीबायोटीक्स दिली जातात. परिणामी, आठवड्यातून 3 वेळा ब्रॉयलर चिकन खाणं म्हणजे 3 वेळा अँटीबायोटीक्सचं इंजेक्शन टोचून घेतल्या सारखं आहे असं एका संशोधनात सागितलं आहे.

7) पुरुषांवर गंभीर परिणाम –  जे पुरुष सातत्यानं ब्रॉयलर चिकन खातात त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसतात. खास करून प्रजनन क्षमतेवर मोठे परिणाम होतात. त्यात स्पर्म्स म्हणजेच शुक्राणूंची ताकद कमी होण्यासारखा गभीर परिणामांचाही समावेश त्यामुळं नपुसंकत्व येण्याचा धोका असतो.

टीप –  वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.