दुर्देवी ! उत्‍तराखंडमध्ये स्कूलबस दरीत कोसळली, 9 विद्यार्थी जागीच ठार

उत्तराखंड : वृत्‍तसंस्था – उत्‍तराखंड मधील टिहरी गढवाल जिल्हयातील कांगसाली येथे स्कूलबस दरीत कोसळल्याने 9 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला तर काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी हा अपघात घडला. स्कूलबसमध्ये एकूण 18 विद्यार्थी होते.

Image

जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.

मदतकार्यायासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले होते. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहचली असून त्यांनी मदत कार्यास सुरवात केली आहे. नेहमीप्रमाणे स्कूलबस चालक विद्यार्थ्यांना घेवुन शाळेकडे निघाला होता.

Image

स्कूलबस दरीच्या जवळून जात असताना अचानकपणे स्कूलबस दरीत कोसळली आणि त्यामध्ये 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असे वृत्‍त आहे. स्कूलबसमध्ये असलेल्या एकुण 18 विद्यार्थ्यांपैकी काहीजण गंभीर जखमी झाले आहे.

Image

जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर तर काही जणांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत कळविण्यात आले आहे.

Image

आरोग्यविषयक वृत्त –